मुंबई

‘वचनपूर्ती जलउत्सव’मध्ये राडा

CD

‘वचनपूर्ती जलउत्सवा’मध्ये राडा
भाजप-बविआत संघर्ष; महिला पत्रकाराशी गैरवर्तन

नालासोपारा, ता. १३ ( बातमीदार) : विरारमधील वचनपूर्ती जलोत्सव कार्यक्रमात रस्ता अडविल्याच्या कारणावरून भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. याच गोंधळात वार्तांकन करणाऱ्या एका यूट्युबर महिला पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ग्लोबल सिटी परिसरात रविवारी (ता. १२) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून बोळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेनंतर बविआचे नेते क्षितिज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने रात्री ३ वाजेपर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण पसरले होते. यावरून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-बविआ यांच्यात एक संघर्षाची ठिणगीच पडली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरार पश्चिम ग्लोबल सिटी परिसरात एच अव्हेन्यू सोसायटीच्या समोर वचनपूर्ती जलोत्सव कार्यक्रमाचे रविवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नालासोपारा भाजपचे आमदार राजन नाईक, वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि काही भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रस्त्याची एक बाजू अडविण्यात आली असल्याच्या तक्रारीवरून बविआ आणि कार्यक्रमाचे संयोजक भाजप कार्यकर्ते यांच्यात गोंधळ निर्माण झाला. दोन्ही आमदार निघून गेल्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू झाला असताना काही यूट्युब पत्रकार संयोजकाचे बाईट घेण्यासाठी गेले असता, तेथील कार्यकर्त्यांनी महिला पत्रकारासोबत गैरवर्तन करीत तिला धक्काबुकी केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
...
मध्यरात्री गुन्हा दाखल
ही घटना कळताच बविआचे क्षितिज ठाकूर, शिवसेना ठाकरे गटाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील, जिल्हाप्रमुख प्रवीण प्रवीण महाप्रलकर तसेच वसई-विरारमधील अनेक पत्रकार बोळिंज पोलिस ठाण्यात जमा झाले होते. मध्यरात्री १२च्या नंतर महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमातील गोंधळाबाबत गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी भाजप नेत्याने पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप जनार्दन पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT