मुंबई

व्यावसायिकाची गाडी फोडून २५ हजारांची रोकड लंपास

CD

अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका व्यावसायिकाची महागडी गाडी फोडून चोरट्यांनी तब्बल २५ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना शहरातील कल्याण-बदलापूर राज्य मार्गावर शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र घुले (वय ३१) हे व्यावसायिक असून, त्यांनी कार पश्चिमेच्या व्हीए बिझनेस सेंटर येथे शुक्रवारी उभी केली होती. गाडीच्या मागील बाजूकडील सीटची काच फोडून २५ हजारांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली. अंबरनाथ पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी या घटनेनंतर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: "निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास अटक होणार..."; कोर्टाच्या निर्णयाने चित्र बदललं, CJI सूर्यकांत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : सराईत सोनसाखळी चोराच्या पंतनगर पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या

Traffic Rules: ई-चालान ४५ दिवसांत भरा, नाहीतर...; केंद्र सरकारकडून नवे ट्रॅफिक नियम लागू, वाहनचालकांसाठी इशारा

Police Misconduct : पोलिस कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; रुग्णांच्या बेडवर लोळले, डस्टबिनमध्ये लघवी केली अन्....

प्राजक्ता माळीने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक, म्हणाली...'त्याच्या बोलण्यातून कधीच चुकीचा शब्द...'

SCROLL FOR NEXT