मुंबई

अंबरनाथ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

CD

अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण सोडत सोमवारी (ता. १३) दुपारी १ वाजता महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ (प.) येथे काढण्यात आली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही आरक्षण सोडत महत्त्वाची ठरली आहे. पर्यवेक्षण अधिकारी व उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा (उल्हासनगर) यांच्या देखरेखीखाली आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.
आरक्षणानुसार एकूण आठ गटांपैकी चोण, नेवाळी, काराव आणि वांगणी हे चार गट महिलांसाठी आरक्षित आहेत. तर चरगांव आणि ना-हेण अनुक्रमे अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (पुरुष) साठी राखीव आहेत. उर्वरित वाडी व चामटोली गट सर्वसाधारण प्रवर्ग (पुरुष) साठी खुले राहिले आहेत. या आरक्षण सोडतीमुळे अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार आहे.

गटनिहाय आरक्षण
९९ - चोण : नामाप्र (महिला)
१०० - चरगाव : अनुसूचित जमाती (पुरुष)
१०१ - नेवाळी : सर्वसाधारण (महिला)
१०२ - ना-हेण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (पुरुष)
१०३ - वाडी : सर्वसाधारण (पुरुष, खुले)
१०४ - चामटोली : सर्वसाधारण (पुरुष, खुले)
१०५ - काराव : अनुसूचित जमाती (महिला)
१०६ - वांगणी : अनुसूचित जाती (महिला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT