मुंबई

पालघरमध्ये स्वबळाच्या चाचपणीला वेग

CD

मोखाडा, ता. १४ (बातमीदार) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्यांनी पालघर जिल्हा ढवळून निघाला आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे, तर शिवसेनेने जिल्ह्यात मेळावे घेत चाचपणी केली असून, पदाधिकारी स्वबळाच्या तयारीला लागले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्याचा धुरळा उडवला आहे. पालकमंत्री गणेश नाईक भाजपचे आहे. जिल्ह्यातील खासदार आणि तीन आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे राजकीय वर्चस्व आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात रजपूत यांनी यापूर्वीच भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप आपली ताकद अधिक वाढवण्यासाठी प्रवेश सोहळे आयोजित केले आहे. या सोहळ्यात अन्य पक्षांतील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांसह पंचायत समितीमध्ये सभापती, नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात या निवडणुकांसाठी महायुती होण्याची धुसर झाली आहे.

भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याने शिवसेना शिंदे गट सावध झाला आहे. शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक, नीलेश सांबरे आणि प्रत्येक भागाच्या जिल्हाप्रमुखांनी तालुकानिहाय कार्यकर्ता मेळावे घेणे सुरू केले आहे. या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणूक कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वेळी वरिष्ठांचे युतीबाबत आदेश आले, तर महायुती करून लढणार. स्थानिक ठिकाणी सहकारी पक्षांनी एकत्रित लढण्याची भूमिका घेतली नाही, तर शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे तालुकाप्रमुख अमोल पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच स्वबळाचा नारा दिल्याने या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

३ मुले आई-वडिलाविना पोरकी! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; शेवटचे समजावून सांगायला गेला अन्‌ चाकूने भोसकून केला पत्नीचा खून

ओळख लपूवन सोलापूरपासून 900KM अंतरावर राहिले पती-पत्नी! भीशीतून 131 जणांना 2.69 कोटींचा गंडा; आंध्रप्रदेशात १५ महिन्यांपासून चालवत होते भजी स्टॉल

SCROLL FOR NEXT