मुंबई

जलजीवन योजनेची कामे रखडली

CD

जलजीवन योजनेची कामे रखडली
अनेक गावांत पाणीटंचाईची भीषण स्थिती; नागरिक त्रस्त
कासा, ता. १४ (बातमीदार) ः शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना डहाणू तालुक्यात रखडल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहेत. ‘हर घर नळ’ हे शासनाचे स्वप्न असले तरी डहाणू तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ही योजना आजही अपूर्णच आहे. शासनाच्या लाखो रुपयांच्या खर्चानंतरही अनेक ठिकाणी पाइपलाइनचे काम पूर्ण झालेले नाही, तर काही ठिकाणी जलकुंभांचे बांधकामच थांबले आहे. धामणी कवडास धरणातून वसई-विरार, बोईसर, तारापूर या शहरांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. या वेळी स्थानिक गावांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ही बाब नागरिकांच्या रोषाचे कारण ठरली आहे.

१०७ पैकी बहुतेक योजना अर्धवट
डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण १०७ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ योजनांचे काम सुरू, ३२ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण, तर केवळ ९ योजना ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. याशिवाय १० योजना पूर्ण होऊन हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजनांचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प आहे.

ठेकेदारांनी काम थांबवले
काम करणाऱ्या ठेकेदारांनी शासनाकडे ‘मागील बिलाची रक्कम न मिळाल्याशिवाय पुढील काम सुरू करता येणार नाही’ असे पत्र सादर केले आहे. त्यामुळे अनेक गावांतील पाणीपुरवठा प्रकल्प ठप्प झाले असून, केवळ तात्पुरत्या स्वरूपात काम सुरू आहे. मोठ्या प्रकल्पांकडे मात्र ठेकेदारांनी हातच आखडता घेतला आहे.

शासनाचा दंडही निष्प्रभ
ठेकेदारांकडून कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने शासनाने जानेवारी २०२५ पासून अपूर्ण प्रकल्पांवर १% दंड आकारण्याचे आदेश दिले होते. मात्र या दंडाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी ठेकेदारांकडून कामाचा वेग अजूनही संथच आहे.

नागरिकांची मागणी
ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे नागरिक संतप्त झाले असून, शासनाने तातडीने जलजीवन योजनेची कामे पूर्ण करून प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा नियमित करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

कोट
डहाणू तालुक्यात १०७ जलजीवन योजना मंजूर आहेत. त्यापैकी ५६ कामे सुरू, ३२ पूर्ण, नऊ ‘हर घर जल’ घोषित आणि १० योजना हस्तांतरित झाल्या आहेत. लवकरच उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- अस्मिता राजापुरे, पाणीपुरवठा योजना अधिकारी, डहाणू

कोट
तालुक्यातील जलजीवन योजना ठरलेल्या कालावधीत पूर्ण न झाल्याने उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. शासनाने अपूर्ण योजना तातडीने कार्यान्वित कराव्यात, ही आमची मागणी आहे.
- सूरज मोरया, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

३ मुले आई-वडिलाविना पोरकी! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; शेवटचे समजावून सांगायला गेला अन्‌ चाकूने भोसकून केला पत्नीचा खून

ओळख लपूवन सोलापूरपासून 900KM अंतरावर राहिले पती-पत्नी! भीशीतून 131 जणांना 2.69 कोटींचा गंडा; आंध्रप्रदेशात १५ महिन्यांपासून चालवत होते भजी स्टॉल

SCROLL FOR NEXT