मुंबई

भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यावर धुळीचा त्रास

CD

भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यावर धुळीचा त्रास
दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक हैराण; टँकरने पाणी मारण्याची मागणी

वज्रेश्वरी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली असली तरी रस्त्याच्या कामामुळे उडणारी धूळ स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार ‘ईगल कन्स्ट्रक्शन कंपनी’कडे तातडीने रस्त्यावर टँकरने पाणी मारण्याची मागणी केली आहे.

दुरुस्तीच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असल्याने श्वासोच्छवास आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषतः लहान मुले व विविध आजार असलेल्यांना याचा जास्त त्रास होत आहे. प्रमोद पवार म्हणाले, “रस्त्याचे काम सुरू झाल्याचा आम्हाला आनंद आहे, पण कामादरम्यान उडणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी टँकरने नियमित पाणी मारावे अन्यथा हे काम नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करेल. गेल्या काही दिवसांपासून हा त्रास वाढला असून, आम्ही लवकरात लवकर उपाययोजना करण्याची विनंती करतो.” भिवंडी जनआंदोलन समितीने यापूर्वी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल आंदोलन केले होते. ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रमोद पवार यांनी केलेल्या उपोषणानंतरच रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली होती, मात्र आता धुळीचा नवा प्रश्न निर्माण झाल्याने पवार हेच पुन्हा एकदा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत.

श्वास घेण्यास त्रास
पवार यांनी कार्यकारी अभियंता (ठाणे), उपअभियंता (भिवंडी) आणि ठेकेदार व्यवस्थापक यांना या मागणीची नोंद करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, “रस्त्याजवळ राहणाऱ्या मुलांना श्वास घ्यायला त्रास होतोय. धूळ घरात शिरते आणि आरोग्य खराब होते. पाणी मारण्याची व्यवस्था तातडीने होणे आवश्यक आहे.” धुळीमुळे वाहतुकीची गती मंदावली असून, वाहनचालकांनाही मोठा त्रास होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

३ मुले आई-वडिलाविना पोरकी! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; शेवटचे समजावून सांगायला गेला अन्‌ चाकूने भोसकून केला पत्नीचा खून

ओळख लपूवन सोलापूरपासून 900KM अंतरावर राहिले पती-पत्नी! भीशीतून 131 जणांना 2.69 कोटींचा गंडा; आंध्रप्रदेशात १५ महिन्यांपासून चालवत होते भजी स्टॉल

SCROLL FOR NEXT