खारघर घरकुल ते वास्तु विहार मार्गे नवीन बससेवा सुरू करण्याची मागणी
खारघर, ता. १४ (बातमीदार) : खारघर सेक्टर १५ ते १८ परिसरातील नागरिकांना खारघर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी बस क्रमांक ५३ व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा नसल्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाकडून खारघर रेल्वे स्थानक ते वस्तूविहार या मार्गावर नवीन बस सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खारघर उपशहर प्रमुख नंदू वारुंगसे यांनी आगार व्यवस्थापकाकडे केली आहे. खारघर सेक्टर १५ ते १७ मध्ये सिडकोने घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन आदी गृहसंकुले उभारली आहेत. तसेच सेक्टर १८ परिसरात जवळपास चार हजार नागरिक वास्तव्य करीत आहे. शिवाय या परिसरात चार शाळा आहेत. या भागात नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाकडून एनएमएमटीची ५३ क्रमांकाची एकमेव बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर कोणताही पर्याय नसल्याने नागरिकांना पायी जावे लागते. तर खारघर टोल नाका येथील बस थांबा गाठावे लागते. तसेच ५० ते ६० रुपये भाडे देऊन खारघर रेल्वे स्थानक गाठावे लागत असल्यामुळे नंदू वारुंगसे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेचे तुर्भे आगारचे व्यवस्थापक सुनील जगताप यांची भेट घेऊन येथील मार्गावर नवीन बस सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान जगताप यांनी लवकरच या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचे नंदू वारुंगसे यांनी सांगितले.
.........
माँ मीनाताई ठाकरे वाचनालयात सुलेखन प्रशिक्षण शिबिर
उरण (वार्ताहर) ः उरण नगरपरिषदचे माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात सुलेखन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अभ्यासक मनोहर जामकर यांनी लायब्ररी आणि अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांना सोळाखडीचे फ्रदर्शनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून लेखन करून घेतले. या वेळी विद्यार्थ्यांनी अतीशय उत्तम व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी शिक्षक मनोहर जामकर यांनी मराठी भाषेचा इतिहास समजावून दिला आणि मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग गरजेचा असल्याची अपेक्षा व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांनी
.......................
पुरंदर स्नेह ग्रंथ संग्रहालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
खारघर (बातमीदार) : येथील पुरंदर स्नेह सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयात मराठी भाषा आठवडा साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुरंदर स्नेह सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय यांच्या वतीने प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक दीपक शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थांना मराठी ही केवळ भाषा नाही, तर संस्कृती, भावना आणि अस्मितेचा श्वास आहे. मराठी भाषा आठवडा हा आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम, अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मराठी भाषेचा सन्मान वाढवणे, वाचन-लेखन आणि बोलण्याची सवय विकसित करणे, तसेच मराठी साहित्य, संस्कृती, नाट्य, कविता आणि इतिहास यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन वर्तमान पत्र, कथा, कादंबरी तसेच जगात काय सुरू आहे, या विषयी सखोल माहितीसाठी वर्तमान पत्रातील संपादकीय लेख वाचन आवर्जून वाचन करावे, असे सांगितले. यावेळी पुरंदर स्नेह सार्वजनिक संग्रहालयाच्या ग्रंथपाल वर्षा शिरसकर, सहाय्यक ग्रंथपाल सिद्धी गुजर, गोखले शाळेच्या शिक्षिका गौरी शिंदे, वर्षा रोकडे आणि दीपक शिंदे उपस्थित होते.
............
सानपाडा रहिवाशाना मिळणार बस शेड
जुईनगर (बातमीदार) : सानपाडा येथील छत्रपती संभाजी चौकाजवळील बस थांब्यावर नुकतेच निवारा शेड उभारण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी परिवहनच्या बस थांब्यांवर निवारा शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ऊन-पावसात प्रवाशांना प्रवास करताना खूपच हाल सोसावे लागत आहेत. शिवाय प्रवाशांच्या माहितीस्तव असणारे कोणतेही सूचना आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक स्थानकावर नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता. याबाबत परिवहन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या मागणीद्वारे नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाने सकारात्मक दृष्टिकोनातून निवार शेड उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.