पनवेलमध्ये नैसर्गिक गोडीच्या सीताफळ मेव्याला मागणी
सीताफळाचे गावरान आणि गोल्डन दोन प्रकार
रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सीताफळ
नवीन पनवेल, ता. १४ (बातमीदार) : हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल लागल्याने पनवेलच्या बाजारपेठेमध्ये सीताफळाची गोड चाहूल पसरली आहे. पनवेल परिसरातील नागरिकांकडून सीताफळाला विशेष मागणी आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत.
नैसर्गिक गोडी, मऊसर गर आणि अद्वितीय स्वादामुळे हे फळ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. शिवाय त्यांचे दरही आवाक्यात असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्यांचा आस्वाद घेता येत आहे. विशेष म्हणजे बार्शी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा यासोबतच हैदराबाद येथून वाशी तसेच पनवेलच्या मार्केटमध्ये आवक होत असल्याचे सीताफळ विक्रेते रईस शेख या विक्रेत्याने ‘दैनिक सकाळ’शी बोलताना सांगितले. त्याचबरोबर १०० रुपये प्रतिकिलो दराने पनवेल परिसरात उपलब्ध होत आहे. बाजारात ठिकठिकाणी सीताफळ विक्रेते दुकाने, हातगाड्या तसेच टोपलीमध्ये घेऊन विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
................
चौकट
गावरान आणि गोल्डन दोन प्रकार
रसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नॅचरल आइसक्रीम म्हणून ओळखले जाते. मागील पंधरवड्यापासून सीताफळाची आवक पनवेल पारिसरात वाढू लागली आहे. बाजारपेठेत दोन प्रकारच्या सीताफळांची आवक झाली आहे. यात गावरान वाणाला प्रतिकिलो ६० ते १०० रुपयांपर्यंत तर मोठ्या आकाराच्या किंवा गोल्डन वाणाला ८० ते १५० रुपये आणि त्यापुढे दर मिळतो आहे.
...............
चौकट
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सीताफळ
जीवनसत्व सी आणि अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सीताफळ विशेष उपयुक्त ठरते. पचन सुधारण्यास, ऊर्जा वाढविण्यास आणि त्वचेला पोषण देण्यासाठीही हे फळ उपकारक आहे. त्यामुळे हंगामात पनवेल परिसरात हातगाड्यांवर त्याचबरोबर लहान टोपल्यांमध्ये मांडलेली ही सीताफळे बाजारात ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. प्रत्येजण निसर्गाची गोड भेट अनुभवत लोक उत्साहाने खरेदी करताना दिसतात. त्यामुळे सीताफळांचा हंगाम म्हणजेच हिवाळ्याच्या गोड सुरुवातीचा आनंददायी संकेत ठरतो.
फोटो --
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.