मुंबई

साधेपणा हीच रतन टाटांची खरी श्रीमंती

CD

साधेपणा हीच रतन टाटांची खरी श्रीमंती
रतन टाटांचे विश्वासू सहकारी माधव जोशी यांनी उलगडला जीवनप्रवास

सकाळ वृत्तसेवा,
डोंबिवली, ता. १४ : टाटा समूहाच्या जगभर पसरलेल्या प्रचंड उलाढालीत उत्तम ग्राहक सेवा, सचोटी आणि प्रामाणिकपणा या मूल्यांना महत्त्व दिले जाते. व्यवसाय करताना सामाजिक सेवेला मोठे स्थान देण्याची ही परंपरा ज्येष्ठ उद्योजक दिवंगत रतन टाटा यांनी आपल्या साधेपणातून जपली, अशी माहिती त्यांचे पूर्वाश्रमीचे टाटा समूहातील विश्वासू सहकारी आणि डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते माधव जोशी यांनी रतन टाटा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात दिली. श्री गणेश मंदिर संस्थानात टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री लक्ष्मी नारायण संस्था, मधुमालती एन्टरप्रायझेस, सवाई ८२ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘रतन टाटा एक माणूस’ या विषयावर बोलताना माधव जोशी यांनी रतन टाटा यांच्या सहवासातील अनेक अनुभव कथन केले. या वेळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

जोशी यांनी रतन टाटा यांचे बालपण, शिक्षण, नोकरी ते यशस्वी उद्योजक हा प्रवास, त्यांचे श्वानप्रेम आणि खास कौटुंबिक सेवकांशी असलेले संबंध अशा अनेक पैलूंना स्पर्श केला. ते म्हणाले, की पद्मविभूषण रतन टाटा यांना आपण यशस्वी उद्योजक, दानशूर आणि नीतिमान उद्योगपती म्हणून ओळखतो. यापलीकडे ते एक साधे, संवेदनशील आणि सहृदय माणूस होते. ‘त्यांच्यामधील साधेपणा आणि प्रामाणिकपणा हीच त्यांची खरी श्रीमंती होती,’ असे जोशी यांनी स्पष्ट केले. टाटा समूह भागधारकांबरोबरच समाजहिताचा विचार करतो, याचा प्रत्यय रतन टाटा यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि कोरोना महासाथीच्या काळात दाखवून दिला. उदारीकरणाच्या धोरणाला इतर उद्योजकांनी विरोध केला असतानाही टाटा समूहाने त्याचे स्वागत केले आणि उदारीकरणात टाटा समूह एकसंध राहील याची काळजी घेतली.

साधे दालन आणि श्वानप्रेम
जोशी यांनी सांगितले, की रतन टाटांचे श्वानप्रेम अफाट होते. घरात श्वान आजारी पडल्यामुळे त्यांनी एकदा मानाचा सन्मान नाकारला होता. आजही बॉम्बे हाउसमध्ये पाळीव आणि भटक्या श्वानांसाठी मोकळे व ऐशोआरामी वातावरण उपलब्ध आहे. रतन टाटा यांची कार्यालयातील दालने अतिशय साधी होती. इतक्या मोठ्या उद्योजकाचे दालन एवढे साधे पाहून कधी खंत वाटायची नाही. कारण त्यांना त्याची पर्वा नव्हती. कार्यालयीन वेळेनंतर ते चालकाचे सहाय्य न घेता स्वतः कार चालवत अतिथींच्या भेटीसाठी ताज हॉटेलपर्यंत निर्धास्तपणे जात असत, हे दृश्य अनेकांसाठी धक्कादायक असायचे.

क्रिकेट हा छंद
क्रिकेट हा त्यांचा छंद होता. फावल्या वेळेत ते क्रिकेटमध्ये रमून जात असत. खडतर मेहनत आणि कष्टातून त्यांनी वाटचाल केल्यामुळे त्यांना व्यवसायातील बारकावे झटकन लक्षात येत असत. जगभरातील गॅझेट्स त्यांच्या संग्रहात होती आणि वेळ मिळेल तेव्हा ते त्याचे वाचन करीत, अशी माहिती जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT