अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
जोगेश्वरी, ता. १४ (बातमीदार) ः मुसळधार पावसामध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. घरं, जनावरं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेती पाण्याखाली गेली आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार, शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीन हजार मदत किटचे वाटप करण्यात येणार आहे. या प्रत्येक किटमध्ये ४० हून अधिक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तूंपासून अन्नधान्यापर्यंत सर्व काही. जोगेश्वरीतील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात मनीषा वायकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मिळून हे सर्व किट्स तयार केले.