मुंबई

नऊ महिन्यांत २५४ सर्पदंश

CD

भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात काही महिन्यांपासून सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरातील वाढती काँक्रीटकरणाची कामे, धोकादायक इमारतींवरील कारवाई आणि नवीन बांधकाम प्रकल्पांमुळे सापांच्या निवाऱ्याचे ठिकाण उद्ध्वस्त होत असल्याने साप आता निवासी परिसरात शिरत आहेत. भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांत तब्बल २५४ सर्पदंशाच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातही सर्पदंशाचा धोका वाढला आहे. शेतीची कामे सुरू असून, मे महिन्यापासून झालेल्या पावसामुळे शेत रस्ते व माळरानांवर झाडाझुडपांचे प्रमाण वाढले आहे. या गवतातून मार्ग काढताना शेतकरी, तरुण व महिलांना सर्पदंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत. या सर्व रुग्णांवर स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, यापैकी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. रुग्णालयात सर्पदंश उपचारांसाठी आवश्यक सर्व औषधे उपलब्ध आहेत. मात्र, गंभीर विषबाधा झाल्यास किंवा व्हेंटिलेटरची गरज भासल्यास रुग्णांना ठाणे किंवा मुंबई येथील रुग्णालयात हलवले जाते. मागील नऊ महिन्यांत २५४ सर्पदंशाच्या घटना नोंदवल्या आहेत. यात जुलै महिन्यात सर्वाधिक ५५ जणांना सर्पदंश झाला आहे.

रुग्णांनी घाबरू नये, सावधगिरी बाळगा!
सर्पदंश झालेल्या रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. मानसिक ताण घेतल्यास विष शरीरात वेगाने पसरते, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद इजहार लाल मोहम्मद अन्सारी यांनी सांगितले. भिवंडीतील वाढती नागरीकरणाची प्रक्रिया आणि पावसाळ्यातील गवताळ परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


महिन्यानुसार घटनांची आकडेवारी
जानेवारी : २२
फेब्रुवारी : १९
मार्च : १६
एप्रिल : १७
मे : २४
जून : ५०
जुलै : ५५
ऑगस्ट : २९
सप्टेंबर : २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT