रेल्वेने ज्या ठिकाणी दगडफेकीच्या घटना वारंवार घडतात, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे आणि प्रवाशांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.
फक्त सुरक्षा उपाययोजना जाहीर करणे पुरेसे नाही; वास्तविक कारवाई आणि प्रवाशांचे संरक्षण हा प्राधान्याचा विषय असला पाहिजे.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ