पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई ः लेखक डॉ. संतोषकुमार फुलपगार यांच्या ‘बुद्ध: द एक्झिक्युटिव कोच’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (ता. १५) करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज सभागृह, शिवाजी मंदिर,
तिसरा मजला, दादर (पश्चिम) येथे हा सोहळा पार पडणार आहे.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव डॉ. हरषदीप कांबळे, माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुंगेरकर, पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात आदींची उपस्थिती असेल. नेशनबिल्डर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.