वज्रेश्वरी, ता. १८ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पाऊस परतल्यास शेतकऱ्यांच्या भातकापणीला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. पावसाने जोर कायम ठेवला, तर भातकापणीवर थेट परिणाम होऊन उत्पादन व उत्पन्न कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा, अंबाडी, मोहिली, पच्छापूर, दाभाड, खंबाळा, घोटगाव, अकलोली, गणेशपुरी, वडवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड झाली आहे. तालुक्यात यंदा सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती करण्यात आली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान सातत्याने पडलेल्या पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली होती. उभे असलेले भातपीक आडवे झाल्याने मोठी नासाडी झाली. काही ठिकाणी करपा व बगळ्या रोगाचा प्रादुर्भावही दिसून आला. मात्र, कृषी विभागाच्या सल्ल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला कापणीला सुरू होते; परंतु परतीच्या पावसामुळे वेळेवर कापणी होऊ शकली नाही. १५ ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांनी भातकापणी सुरू केली. किरवली राउत पाडा येथील शेतकरी शिवाजी राऊत म्हणाले, काही भागांत भात ओलसर असल्याने कापणी शक्य नाही; अनेक ठिकाणी कापणीसाठी भात कापून ठेवला आहे; मात्र ओलसर असल्यामुळे पीक खराब होण्याची शक्यता आहे, असे घोटगाव येथील राजू पाटील यांनी मोठ्या नुकसानाची माहिती दिली.
शेती तज्ज्ञांचे मत
कृषी विभागाचे अधिकारी म्हणाले, शेतात पाणी साचल्यामुळे कापणीला उशीर होत आहे. यामुळे भाताच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. पेरणीला उशिरा झाला आणि आता कापणीही उशिरा होणार आहे.
सरकारकडून मदतीची मागणी
शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई व विमा दाव्यांची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत; मात्र शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.