सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला
‘मुंबई पोर्ट’ला परवानगीची विनंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः मुंबई महापालिकेच्या वतीने फोर्ट भागातील कोचीन स्ट्रीट येथे सफाई कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमन २०३४ अंतर्गत या प्रकल्पाला परवानगी देण्याची विनंती मुंबई पोर्ट प्राधिकरणाला केली आहे. ही परवानगी न मिळाल्याने हा प्रकल्प रखडला आहे. कामगार मात्र या प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई बंदर प्राधिकरणाच्या उपमुख्य अभियंता (विशेष नियोजन प्राधिकरण) यांना लिहिलेल्या पत्रात पालिकेचे उपआयुक्त (एसडब्ल्यूएम) यांनी म्हटले आहे की, त्या जमिनीचा काही भाग मुंबई पोर्ट प्राधिकरणाचा असल्याने त्यासाठी लवकर परवानगी देण्यात यावी. ७ ऑक्टोबर २०२५च्या पत्रानुसार, पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर परवानगी असलेले बांधकाम क्षेत्र ८७३.२३ चौरस मीटर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. डीसीआर १९९१नुसार म्हणजेच १.३३ एफएसआय ३५ टक्क्यांपेक्षा अधिक फंजिबल एफएसआय प्रस्तावित बांधकाम क्षेत्र १८०४ चौरस मीटर आहे. त्यामुळे मुंबई पोर्ट प्राधिकरणाने लवकरात लवकर ना हरकत द्यावी जेणेकरून सफाई कामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी नऊ मजली इमारत विकसित करता येईल.
...
बैठक घेण्याची मागणी
कोचीन स्ट्रीट सफाई कामगारांसाठी निवासस्थानांच्या विकासाबाबत सर्व संबंधितांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्तक्षेपाची मागणी करीत मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु आणि अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक बोलावण्याची विनंती भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने होईल, असे नार्वेकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.