मुंबई

काशिमिरामध्ये दोन गटांत हाणामारी

CD

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) ः काशिमिरा भागातील डाचकूल पाडा परिसरात सोमवारी (ता. २०) मध्यरात्री वाहन उभे करण्याच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या वादादरम्यान काही महिलांची व तरुणींची छेडदेखील काढण्यात आली होती. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून परिसरातील वीसहून अधिक रिक्षा व अन्य वाहनांची तोडफोड करण्यात आली. काशीगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. २१) तातडीने डाचकूल पाडा येथे भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या घटनेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना या प्रकरणातील आरोपींवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या संघर्षामागे केवळ स्थानिक वाद नसून, अमली पदार्थ विक्रीचे जाळे आणि बांगलादेशी तसेच रोहिंग्या घुसखोरांचा सहभाग असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोन्ही गंभीर बाबींचा कसून तपास करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

हाणामारीनंतर परिसरात तणावाचे वातावरण असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, तोडफोड आणि छेडछाडीमध्ये सामील असलेल्या उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Latest Marathi News Live Update : तर आम्ही आणखी मोठा बॉम्ब फोडणार! मनोज जरांगे पाटील आक्रमक

आधी सौंदर्यस्पर्धांवर बंदी, आता मृत्युदंडाची शिक्षा! बुर्किना फासोच्या निर्णयांची का आहे जगभरात चर्चा?

SCROLL FOR NEXT