मुंबई

डोंबिवलीत ''शब्दमयी दिवाळी पहाट''

CD

डोंबिवलीत ‘शब्दमयी दिवाळी पहाट’
डोंबिवली, ता. २१ : समाजमाध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वेगवान झालेल्या सध्याच्या जीवनशैलीत, एका तरल, भावरम्य आणि आशय-सुगंधी झुळुकेचा अनुभव डोंबिवलीकरांनी घेतला. मंगळवारची (ता. २१) पहाट मिलापनगर येथील ‘वंदे मातरम् उद्यान’ परिसरात ‘शब्दमयी’ झाली. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील ‘मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन’ने आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.

प्रसाद कांत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडिक यांच्या प्रयत्नातून आयोजित झालेल्या या अनोख्या ‘काव्य शस्त्र मनोरंजन’ मैफलीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली, ज्यामुळे आयोजकांचा उत्साह वाढला. या वेळी अश्विनी मयेकर-मराठे यांनी डॉ. प्रल्हाद देशपांडे यांच्यासोबत साधलेल्या संवादातून एका समर्पित आणि सत्वगुणांची कदर करणाऱ्या कार्यशैलीचा श्रोत्यांना परिचय झाला. अश्विनी मयेकर-मराठे यांनी आपल्या ओघवत्या, नेमक्या आणि ऋजु (सरळ) भाषेच्या शैलीतून एक पत्रकार, साक्षेपी संपादक आणि विचक्षण वाचक यांचे नेमस्त मिश्रणच रसिक श्रोत्यांसमोर ठेवले.

संवादाच्या मधूनमधून पेरलेल्या कवितांनी कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. डॉ. पुरुषोत्तम काळे यांची पर्यावरणाचा समतोल साधणारी ‘नदीचा विलाप’ ही नदीच्या रूपकाद्वारे मांडलेली कविता, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या मुकुंद साबळे यांची ‘सुख असावं फुलासारखं’ ही कविता, आणि शैला वाणी यांनी सादर केलेली ‘खरं सांग मला तू कोण गं अशी?’ ही भावरम्य कविता रसिक श्रोत्यांची विशेष दाद घेऊन गेली.

कलाकारांना रोपे देऊन सन्मान
श्रेया भानप यांचे समर्पक आणि अचूक काळवेळेचे भान राखत केलेले सूत्रसंचालन कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले. डॉ. प्रल्हाद देशपांडे यांनी अश्विनी मयेकर-मराठे यांना बोलतं करत असतानाच ‘बरे नव्हे’ ही कवींना टपली मारणारी खुसखुशीत कविता ऐकवून रसिकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. ठीक एका तासात आटोपलेल्या या कार्यक्रमामुळे दिवाळीची सकाळ एका प्रगल्भतेने उजळून निघाली. या वेळी उपस्थित सर्व कलाकारांना रोपे देऊन प्रसाद कांत यांनी मिलापनगर रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. दिवाळी फराळ आणि चहा सेवनाने या पहाटेच्या साहित्य सोहळ्याची उत्साहात सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT