मुंबई

फेरीवाल्यांच्चा बंदोबस्तासाठी रिक्षा युनियनचा आक्रमक

CD

फेरीवाल्यांच्या बंदोबस्तासाठी रिक्षा युनियन आक्रमक
डोंबिवलीत २४ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा

डोंबिवली, ता. २१: पश्चिम रेल्वे स्थानक ते शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांवर दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय केल्यामुळे रिक्षा चालकांना रिक्षा चालवणे कठीण झाले आहे. या रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून ''डोंबिवली शहर रिक्षा चालक मालक संघटने''ने येत्या शुक्रवारी रिक्षा चालकांच्या सहकार्याने कल्याण-डोंबिवली पालिकेच्या ''ह'' प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनासंदर्भात रिक्षा चालक मालक संघटनेने महापालिका आयुक्तांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांनी कसे ठाण मांडले आहे आणि त्यामुळे रिक्षा चालकांना कसा त्रास होत आहे, याची व्यथा मांडण्यात आली आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोड हा सर्वाधिक प्रवासी आणि वाहन वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा सकाळ-संध्याकाळ फेरीवाले रस्ते आणि पदपथ अडवून बसलेले असतात. यामुळे इतर वाहनांबरोबर रिक्षा चालकांना या भागातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. आयुक्तांनी डोंबिवली पश्चिमेतील फेरीवाल्यांच्या समस्येची गंभीर दखल घेऊन रिक्षा चालकांना फेरीवाल्यांमुळे कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. या फेरीवाल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास २४ ऑक्टोबर रोजी रिक्षा चालक पालिकेच्या ''ह'' प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT