मुंबई

शेतकऱ्यांची दिवाळी चिखलात!

CD

शेतकऱ्यांची दिवाळी चिखलात!
नुकसानीमुळे बळीराजाचे हाल; भातपीक कापणीसाठी धावपळ

टोकावडे, ता. २१ (बातमीदार) ः दिवाळीच्या पारंपरिक आनंदाला यंदा मुरबाड तालुक्यातील बळीराजाला मुकावे लागले आहे. गावोगावी दिवाळीचा सण साजरा होत असताना, मुरबाड पंचक्रोशीतील शेतकरी मात्र हातात विळा घेऊन आणि पाठीशी काठी ठेवून शेतातच राबताना दिसत आहेत.

गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि ऑक्टोबर महिन्यातील वाऱ्यामुळे भातपिकाची कापणी होत असतानाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी साजरी न होता थेट शेतात कष्टात होत आहे.

२१ ऑक्टोबर रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घातला. वाऱ्याच्या झोताने शेतातील भाताचे उभे पीक चिखलातच कोसळले. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने त्यांची काढणी करणेही शक्य होत नव्हते. कर्जत तालुक्यात तर तब्बल ९० टक्के शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेल्याची नोंद प्रशासनानेही केली आहे. संपूर्ण पिकांची कापणी करण्यास सज्ज असलेल्या शेतकऱ्यांवर हे अवकाळी संकट कोसळल्याने ते हवालदिल झाले आहेत.

वर्षातून एकदाच घेण्यात येणारे भातपीक हे ग्रामीण कुटुंबाचा आर्थिक कणा असते. त्यावरच वर्षभराचे कुटुंबाचे उदरनिर्वाह, कर्जफेड, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च अवलंबून असतो; मात्र यंदा हातात पिकाचे सोने येण्याआधीच निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पावसामुळे आजही अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, भाताचे मोळे चिखलात बुडाले आहेत. सतत पाण्यात राहिल्यामुळे दाण्याला मोड (अंकुर) येण्याचा धोका निर्माण झाला आहे. पीक बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना कंबर कसून प्रचंड कष्ट करावे लागत आहेत.

मदतीची मागणी
धसई, टोकावडे, म्हसा, सरळगाव यांसारख्या परिसरातील शेतकरी पाण्यामधून भातपीक बाहेर काढताना दिसत आहेत. महिलांपासून ते युवकांपर्यंत घरातील सर्व सदस्य दिवाळी बाजूला ठेवून शेतात उतरले आहेत.
दिवाळी गोडधोड, फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदाचे क्षण मनावरील ताण विसरण्यासाठी साजरी केली जाते; परंतु या भागातील शेतकऱ्यांची दिवाळी मात्र कष्टातून आणि महापरिश्रमातून जात आहे. शासनाने पंचनामे सुरू केले असले तरी तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत. ‘उजेडाच्या दिवाळीतही आमच्या आयुष्यात अंधार कायम राहील’, अशी खंत बळीराजा व्यक्त करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT