मुंबई

ढगांच्या गडगडाटासह बदलापुरात मुसळधार पाऊस

CD

ढगांच्या गडगडाटासह बदलापुरात मुसळधार पाऊस
बदलापूर, ता. २१ (बातमीदार) ः शहरात परतीच्या पावसाने दिवाळीच्या उत्साहावर विरजण टाकले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सव्वापाचपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याचा बदलापूरकरांचा उत्साह ओसरला.

वाऱ्याच्या वेगासह इतका मुसळधार पाऊस कोसळला, की हौशी लोकांचा हिरमोड झाला. पावसाचा जोर इतका जास्त होता, की समोरचे दृश्यदेखील दिसेनासे झाले होते. यंदा मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने ऑक्टोबर महिन्यातही विश्रांती घेतलेली नाही. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी प्रचंड वाऱ्याचा वेग, विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह बदलापुरात जोरदार पाऊस कोसळला. लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे, दिवाळीत फटाके फोडण्याची हौस असलेल्या बदलापूरकरांचा मोह मात्र कमी झाला. यावर्षी पावसाने अनेक सणांच्या दिवशी हजेरी लावल्यामुळे, सण साजरा करण्याच्या आनंदावर पावसाने परिणाम केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT