मुंबई

रांगोळीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ला सलाम

CD

विरार, ता. २३ (बातमीदार) : वसई तालुक्यातील जूचंद्र या गावासह बाजूच्या परिसरातील रांगोळी कलाकारांनी रांगोळीच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. वेगवेगळ्या प्रकारातील रांगोळीने त्यांनाही देशातीलच नव्हे, तर परदेशातील रसिकांनाही आपल्या कलेने भुरळ घातली आहे. यंदा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यंदा भारतीय सैन्याच्या पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर काढलेल्या रांगोळीला रसिकांचा प्रतिसाद मिळत असून, कौतुक करण्यात येत आहे.

वसई तालुक्यातील जूचंद्र गाव म्हटले की, डोळ्यासमोर येते ती या मातीतील कला. यात नाट्यकला, भजन आणि रांगोळी या कलेच्या प्रांतात येथील कलाकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची कला सातासमुद्रापार गेली आहे. येथील कलाकार हे दरवर्षी दिवाळीत एकत्र येऊन आपल्या कलेचे प्रदर्शन रसिकांना घडवत आहेत. या प्रदर्शनात शिवाजी महाराज, भारतीय सैनिक, एकविरा देवी, बाळ गणपती, थ्रीडी रांगोळी, राधा-कृष्ण, युद्ध आणि युद्धातील स्थिती यावरील रांगोळी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा या प्रदर्शनात मनोज पाटील, प्रवीण भोईर, जय म्हात्रे, करण वटा, गणेश सालियन, साई भोईर, संजय पाटील, केतन पाटील, हर्षद पाटील व इतर रांगोळी कलाकारांनी आपली कला साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa : पत्नीला वाचवलं, तिच्या बहिणींना वाचवायला गेलेल्या पतीचा अन् ३ बहिणींचा मृत्यू; कुटुंबातल्या चौघांचा अंत

Pune News : पुण्यातील प्रकल्पांची कोंडी फुटणार का? आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा

बिबटे जेरबंद केले पण खर्च परवडेना, वनतारात पाठवण्याचा प्रस्ताव; एका बिबट्यासाठी दिवसाला किती खर्च येतो?

Gold Rate Today : सोन्याच्या भाव घसरले; या कारणामुळे सोनं-चांदी स्वस्त! काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव

Latest Marathi News Update : विरोधी पक्ष नेतेपदासाठी कॉंग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT