मुंबई

कल्याण अवती-भवती

CD

जनजागृती सेवा संस्थेची आजी-आजोबांसोबत दिवाळी
डोंबिवली (बातमीदार): दीपावलीच्या निमित्ताने डोंबिवली पश्चिमेकडील गरिबाचा वाडा येथील ‘सरोवर नगर वृद्धाश्रमा’तील आजी-आजोबांचे तोंड गोड करण्याच्या उद्देशाने जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमाच्या संचालिका सुमेधा थत्ते समर्थपणे या वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन करत आहेत. संस्थेच्या वतीने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना खाऊचे पदार्थ, फळे, फ्रुटी, आकर्षक कापडी पिशव्या आणि खास दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सल्लागार दिलीप नारकर, रामजीत गुप्ता, अरविंद सुर्वे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप शिरसाट, ''सा. अंतिम शब्द''चे संपादक श्रीकांत म्हात्रे, ''म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट''च्या संचालिका शर्मिला केसरकर, समाजसेविका शीतल कदम, वीणा देवळेकर, सुनंदा राणे, तसेच समाजसेवक रवींद्र कुलकर्णी, शरद खानविलकर, प्रदीप पाटील आणि सिध्दप्पा भोरकडे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. जनजागृती सेवा संस्थेचे पदाधिकारी दत्ता कडुलकर, श्रुती उरणकर, सविता ठाकूर आणि गुरुनाथ तिरपणकर यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचा आभारपत्र आणि दिवाळी वस्तू देऊन यथोचित सत्कार केला. शेवटी, सर्व आजी-आजोबांना सोबत घेऊन फुलबाज्यांची आतषबाजी करत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले, तर संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
..........................

‘मायबोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हास’ कार्यक्रम
डोंबिवली (बातमीदार): मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होऊन ३ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याने ''स्वयम्'' संस्थेच्या वतीने ‘मायबोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हास’ या अनोख्या कार्यक्रमाचे सलग चार प्रयोग आयोजित करण्यात आले. मराठीचे विविध सांस्कृतिक पैलू अभिवाचनात्मक आणि सांगीतिक पद्धतीने हसत-खेळत उलगडून दाखवणारा हा कार्यक्रम अनेक शहरांमध्ये गाजला आहे.
दीपोत्सव विशेष या अंतर्गत हे चार प्रयोग अनुक्रमे १८, १९, २० आणि २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले. ठाण्यातील सहयोग मंदिर, कल्याणमधील अत्रे रंगमंदिर मिनी हॉल, डोंबिवलीतील सीकेपी हॉल (टिळकनगर) आणि गिरगाव येथील चित्पावन ब्राह्मण संघ येथे हे प्रयोग झाले. डॉ. मेघा विश्वास यांची संकल्पना, आरेखन, निर्मिती, दिग्दर्शन आणि सहभाग असलेला हा मनोरंजक, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण कार्यक्रम मराठीप्रेमी रसिकांना चांगलाच आवडला आहे. यामध्ये डॉ. मेघा विश्वास यांच्यासह अभिनेते संजीव धुरी, मानसी गर्गे, समीर सुमन, अंशुमान गद्रे, शशांक पडवळ आणि वरुण देवरे या कलाकारांचा सहभाग होता. या चारही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत पानसे, अभिनेते रमेश वाणी, अभिनेत्री वंदना मराठे, अभिनेत्री चिन्मयी सुमित, आर जे रश्मी वारंग, व्हॉईस गुरु दीपक वेलणकर आणि अभिनेते आनंदा कारेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
....................................

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
कल्याण (वार्ताहर): समाजाला उत्तमोत्तम सामाजिक कार्यकर्ता मिळावा या उद्देशाने ''संकल्प'' संस्थेच्या वतीने ‘सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग’ आयोजित करण्यात आला आहे. संकल्प संस्था गेल्या बारा वर्षांपासून मुंबई आणि ग्रामीण विभागांमध्ये वस्ती विकास प्रकल्पांतर्गत अनेक सामाजिक विषयांवर कार्यरत आहे. हा प्रशिक्षण वर्ग रविवार, १६ नोव्हेंबरपासून नेहरूनगर, कुर्ला या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गात प्रत्यक्ष वस्ती पातळीवर कार्य करण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण अनुभवी तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. तसेच, शासकीय-निमशासकीय संस्था व संघटनांच्या कार्यालयांना भेटी देऊन प्रॅक्टिकल नॉलेज (प्रत्यक्ष ज्ञान) देखील देण्यात येणार आहे.हा प्रशिक्षण वर्ग एकूण २० आठवड्यांचा असेल, ज्यात १५ रविवार व्याख्याने आणि ५ शनिवार संस्था, संघटना भेटींचा समावेश आहे. प्रशिक्षण वर्गात साधारण ३५ ते ४० महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये समाजकार्य, संस्था व्यवस्थापन, निधी संकलन, प्रकल्प अहवाल लेखन, सरकारी योजना, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, भारतीय संविधान, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ, पोलीस यंत्रणा, अपंग-ज्येष्ठ नागरिक अधिकार, रेशनिंग, रुग्ण हक्क, मानवी तस्करी, माहितीचा अधिकार, नशा मुक्ती अभियान आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
.................................

राम महाराज काजळे यांना भागवत भूषण पुरस्कार
कल्याण (वार्ताहर): यंदाचा भागवत भूषण पुरस्कार ह.भ.प. राम महाराज काजळे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच ह.भ.प. जगताप बाबा आडगावकर यांचा ७५ वा अभिष्टचिंतन सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही निमित्ताने श्री क्षेत्र चारधाम चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने भूवैकुंठ पंढरपूर येथील जगन्नाथ महाराज मठ, गोपाळपूर येथे श्रीमद्भागवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वैकुंठवासी गुरुवर्य दादा महाराज मनमाडकर यांच्या आशीर्वादाने आणि अध्यक्ष ह.भ.प. जगताप बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. सप्ताह काळात कथाव्यास ह.भ.प. शीतल गवारे यांचा श्रीमद्भागवत कथा कार्यक्रम रोज सकाळी ९ ते ११ या वेळेत होईल. दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामवंत महाराजांचे कीर्तन होणार आहे. यामध्ये ह.भ.प. बाळासाहेब महाराज वाघचौरे, ह.भ.प. विलास महाराज फडतरे, ह.भ.प. गणेश महाराज राठोड, ह.भ.प श्याम महाराज शास्त्री, ह.भ.प. मधुकर महाराज पाटील, ह.भ.प. अर्जुन महाराज लाड आणि ह.भ.प. नामदेव महाराज आव्हाड यांचे कीर्तन होईल. काल्याचे कीर्तन ह.भ.प. शहाजी महाराज पाटील, कोल्हापूर यांचे होईल. काल्याच्या महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
..............................

शंभुदुर्ग संघटनेकडून अनाथ आश्रमात दिवाळी साजरी
कल्याण (वार्ताहर): शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने दिवाळी उत्सवानिमित्त समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. कर्जत येथील हॅपी फॉल्क फाउंडेशन वृद्धाश्रमात वृद्ध माता-पित्यांसोबत ''दिवाळी'' आणि भिवपुरी येथील अनाथ आश्रमात अनाथांच्या सोबत दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी शंभुदुर्ग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदेश चौधरी, महासचिव संजय चौधरी, कार्याध्यक्ष मोहन डोहळे, प्रवक्ते रुपेश गायकर, खजिनदार विलास जाधव, जिल्हाध्यक्ष सागर मोरे, संपर्क प्रमुख संजय लोंढे, कर्जत तालुका अध्यक्ष विनोद भोईर, रायगड तालुका अध्यक्ष परशुराम माळी, जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. संस्थेच्या वतीने वृद्धाश्रमातील वृद्ध माता-पित्यांना गोड जेवण देण्यात आले. तसेच, वृद्धांना आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी ठरेल असे हेल्थ किट, मिठाई आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तर, अनाथ आश्रमात मुलांसोबत फटाके लावून त्यांचा आनंद द्विगुणित करत दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. संघटनेच्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमातील रहिवाशांच्या जीवनात दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे क्षण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT