मुंबई

कळवा रुग्णालयात २५ अतिरिक्त खाटा

CD

कळवा रुग्णालयात २५ अतिरिक्त खाटा
तरीही दाखल महिलांची संख्या अधिक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर या दोन्ही कक्षांत क्षमतेपेक्षा अधिक महिला ठेवण्यात येत असून, अनेक महिलांचे इतर रुग्णालयात स्थलांतर करण्यात येत होते. सोमवारी प्रसूती कक्षात २५च्या जागी पाच खाटा वाढविण्यात आल्याने संख्या ३०वर पोहोचली; मात्र त्या कक्षात आता ४२ महिला दाखल आहेत. प्रसूतीनंतरच्या कक्षातही वाढीव २० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. एकंदरीतच खाटा वाढल्या तरी दाखल महिलांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमी विविध कारणांनी चर्चेचा विषय बनला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या रोजच्या रोज वाढत असल्याचे चित्र दिसून आले. मागील दोन महिन्यांत येथे उपचारासाठी आलेल्या ७८ महिलांना खाटा नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाडण्यात आले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या रुग्णालय प्रशासनाने प्रसूती कक्षाचा ताण कमी करण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या २५ खाटांच्या ठिकाणी आणखी पाच खाटा वाढविल्या. सोमवारी या कक्षात ४२ महिला दाखल असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच प्रसूतीच्या महिलांचे कोणत्याही प्रकारचे हाल होणार नाहीत, याचीदेखील काळजी घेण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
प्रसूतीनंतर महिलांना विशेष कक्षात दाखल करण्यात येते. येथील क्षमता ५० एवढी होती. परंतु आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना काळात तळमजल्यावर असलेल्या विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी २० वाढीव खाटा सज्ज केल्या असून, काही महिलांना त्या ठिकाणी ठेवले जात आहे. त्यामुळे महिला कक्षावरील ताण काहीसा कमी झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
...
आणखी ३४० खाटा वाढविणार!
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे शहरासह आजूबाजूच्या भागातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात सध्या ५०० खाटा असून, या रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी १३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ६० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्याचे काम आता महापालिकेच्या सार्वजनिक विभागाने हाती घेतले आहे. हे काम करीत असताना आणखी ३४० खाटा वाढविल्या जाणार आहेत. प्रसूती कक्षातील २५ खाटांची क्षमता ३५पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Latest Marathi News Live Update : फलटणमधील डॉक्टर आत्महात्या प्रकरणी संशयित आरोपींना २ दिवसाची पोलिस कोठडी

'बाबा आम्हाला वाचवा' खिडकीतून मुलं ओरडत होती, बाहेरून पालकांचा जीव कासावीस होत होता, पवई स्टुडिओ प्रकरणातील धक्कादायक Video

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Baba Vanga Horoscope Prediction : भयंकर ! पूर्वेत युद्ध ते सोन्याच्या किंमतीत महत्वाचे बदल ; बाबा वेंगाची 2026 साठीचं भाकीत उघड

SCROLL FOR NEXT