मुंबई

पक्षातील पडझड आणि बाहेर जाणारे कार्यकर्ते थांबवावे

CD

पक्षातील पडझड थांबवावी
आनंद परांजपे यांचा रोहित पवार यांना सल्ला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : रोहित पवार यांना पक्षाचे नेतृत्व बनण्याची अतिघाई असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे, पक्षातील पडझड आणि बाहेर जाणारे कार्यकर्ते थांबवावे, असा सल्ला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला. अजित पवार आणि तटकरे यांनी संग्राम जगताप यांना समज दिली आहे. त्यामुळे त्यांची काळजी करण्याची गरज नाही. ते काय ज्योतिषी आहेत का, असा सवालही परांजपे यांनी उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाड हे नेहमी दुबार नावांवर बोलतात, पण त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात तब्बल १९ हजार दुबार नावं आहेत. मुंब्रा-कळवा आणि कल्याण ग्रामीण भागात १४ हजार दुबार नावं आहेत. त्याबद्दल त्यांनी कधी आवाज उठवला नाही. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातही बोगस मतदार आहेत हे त्यांनी मान्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. आव्हाड हे नकलाकार आहेत. ते म्हणतात आमच्या पक्षाचे बारा वाजले, पण त्यांच्या शहरात त्यांच्या पक्षाचेच बारा वाजले आहेत. त्यांचे जिल्हाध्यक्ष, युवकाध्यक्ष, नगरसेवक आणि अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांना आधी आपल्या घराकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आदित्य ठाकरे आता वरळीत १९ हजार बोगस मतं असल्याचं सांगत आहेत. पण जेव्हा अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढले, तेव्हा हीच मतं बोगस वाटली नाहीत का? लोकसभेत विजय मिळाल्यावर मतदार याद्या योग्य वाटतात, पण विधानसभेत पराभवानंतर त्याच याद्यांवर शंका घेतली जाते. हा विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढणं शक्य
ठाण्यातील युतीबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे. महायुती म्हणून जिथे शक्य असेल तिथे एकत्र लढायचं, ही आमची मानसिकता आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढणं शक्य आहे, पण एकमेकांवर टीका न करता निवडणुका लढवल्या जातील, असे आनंद परांजपे यांनी स्पष्ट सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Latest Marathi News Live Update : फलटणमधील डॉक्टर आत्महात्या प्रकरणी संशयित आरोपींना २ दिवसाची पोलिस कोठडी

'बाबा आम्हाला वाचवा' खिडकीतून मुलं ओरडत होती, बाहेरून पालकांचा जीव कासावीस होत होता, पवई स्टुडिओ प्रकरणातील धक्कादायक Video

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Baba Vanga Horoscope Prediction : भयंकर ! पूर्वेत युद्ध ते सोन्याच्या किंमतीत महत्वाचे बदल ; बाबा वेंगाची 2026 साठीचं भाकीत उघड

SCROLL FOR NEXT