अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे नेते श्याम गायकवाड यांनी अंबरनाथमधील ‘प्रस्थापित’ राजकीय शक्तींना निवडणुकीतून हद्दपार करण्याचे आवाहन केले आहे. लेबर फ्रंट कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली.
अंबरनाथ पश्चिम येथील लेबर फ्रंट कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीत गायकवाड म्हणाले, अंबरनाथमधील २६ झोपडपट्ट्यांतील मतदार मनुवादी विचारसरणीला मतदान करणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरी जनतेने प्रस्थापित राजकारण्यांना धडा शिकवायलाच हवा. ते पुढे म्हणाले, समविचारी पक्षांशी युती किंवा आघाडी करून आम्ही आगामी निवडणुकीला सज्ज होत आहोत. मतदारांना गृहीत धरून राजकारण करणाऱ्यांना आता जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, शहरातील राजकारणाची दिशा वेगाने बदलत असल्याचे जाणकारांचे मत आहे. निवडणुका आता वेगळ्या पद्धतीने लढल्या जात आहेत आणि त्यासाठी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांमध्ये संघटनक्षमतेची गरज असल्याचे निरीक्षण व्यक्त होत आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकानेही बहुजन समाजात एकजुटीचा अभाव असल्याचे मत मांडले. कोणी काहीही म्हणो; परंतु बहुजन समाजात आज एकमत राहिलेले नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत बहुजन समाजाची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अंबरनाथच्या राजकारणात अलीकडे मोठे फेरबदल झाले आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत या बदलांचा कोणावर प्रभाव पडतो, हे आता वेळच ठरवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.