मुंबई

मासळी बाजार बंदिस्त

CD

अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : अंबरनाथमधील ४० वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या मासळी बाजाराला पालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता लोखंडी जाळी लावून बंदिस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. २७) सकाळी करण्यात आली. यामुळे दशकांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या मासळी विक्रेत्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. ही कारवाई काही विकसक व्यावसायिकांच्या दबावाखाली केल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
अंबरनाथ पूर्व येथील मुख्य चौकात अलीकडेच नव्या हॉटेलचे बांधकाम झाले आहे. हे हॉटेल सुरू झाल्यापासूनच मासळी बाजार हटविण्याची मागणी सुरू होती. स्थानिक विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, सौंदर्यीकरण आणि पार्किंगच्या नावाखाली गरीब विक्रेत्यांना हाकलवण्याचा हा प्रयत्न आहे. बाजार हटवल्याने अनेक कुटुंबांचा रोजगारच हिरावला आहे. पालिकेने या कारवाईबाबत कोणतीही लेखी नोटीस दिली नव्हती. सोमवारी सकाळी अचानक लोखंडी जाळी लावून मासळी बाजार परिसर बंद केला. यामुळे विक्रेत्यांना आपला माल आणि साहित्य बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. ही कृती अन्यायकारक असून, प्रशासन गरिबांवर अन्याय करत आहे, असा संताप विक्रेत्यांनी व्यक्त केला. पालिका प्रशासनाने पक्के गाळे देऊन पुनर्वसन करावे किंवा पर्यायी जागा म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चित करावा. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे.

या ठिकाणी ४० वर्षे या ठिकाणी व्यवसाय केला. पालिकेने कधीही आडकाठी केली नव्हती; पण हॉटेल सुरू झाल्यापासून कारवाई सुरू झाली. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वास येऊ नये, म्हणून ही कारवाई केली जाते. सोमवारी काही महिलांना पालिका सुरक्षारक्षकांनी अगदी फरफडत नेले. आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, तो कुणीही दुर्लक्षित करू नये.
- सुनंदा कोळी, मासळी विक्रेता

पालिका मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक हितासाठी गोरगरिबांच्या उपजीविकेवर घाला घालत आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली साध्या माणसांचा उदरनिर्वाह हिरावून घेत आहे.
- हौसा भोईर, मासळी विक्रेता

पालिकेने राजकीय टपऱ्यांना अभय दिले; पण गरीब विक्रेत्यांवर कारवाई केली. आम्हाला त्वरित हक्काची जागा किंवा फेरीवाला क्षेत्र द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करू.
- प्रमोद शिंदे, हॉकरझोन संघटनेचे उपाध्यक्ष

पालिकेने आरोप फेटाळले
पालिकेने मासळी विक्रेत्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. परिसरात अस्वच्छता पसरत असल्याने नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Latest Marathi News Live Update : फलटणमधील डॉक्टर आत्महात्या प्रकरणी संशयित आरोपींना २ दिवसाची पोलिस कोठडी

'बाबा आम्हाला वाचवा' खिडकीतून मुलं ओरडत होती, बाहेरून पालकांचा जीव कासावीस होत होता, पवई स्टुडिओ प्रकरणातील धक्कादायक Video

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Baba Vanga Horoscope Prediction : भयंकर ! पूर्वेत युद्ध ते सोन्याच्या किंमतीत महत्वाचे बदल ; बाबा वेंगाची 2026 साठीचं भाकीत उघड

SCROLL FOR NEXT