मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा
रोहा, ता.२९ (बातमीदार) ः गेल्या अनेक दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घेतल्याने शेती आणि कडधान्याची नासाडी झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रोहा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लेखी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यापासून सर्वत्र पाऊस पडत आहे. विशेषतः ऑक्टोबर महिन्यात भात कापणी होत असताना, अवकाळी पवासाने थैमान घातल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. तर कडधान्यदेखील वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या समोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी रोहा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील देशमुख यांनी केली आहे. मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीविषयी चर्चा करून मदत द्यावी, अशी मागणी केली. या वेळी तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, गजानन गायकर, भरत कान्हेकर, महेश देशमुख आदी जण उपस्थित होते.
...................
स्व. बाबूराव भोनकर उद्यान नामफलकाचे उद्‌घाटन
माणगाव (वार्ताहर) ः कुणबी समाजाच्या कल्याणासाठी अखंड झटणारे, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातून समाजपरिवर्तनाचे ध्येय जपणारे स्वर्गीय बाबूराव भोनकर हे आमच्या सर्वांच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण सर्वांनी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत ‘घड्याळाचे बटन दाबून’ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी भावनिक साद खासदार सुनील तटकरे यांनी दिली. माणगाव तालुक्यातील साले गाव येथे नव्याने साकारण्यात आलेल्या आणि सुशोभीकरण झालेल्या ‘बाबूराव भोनकर उद्यानाचे’ उद्‌घाटन खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी खासदार तटकरे म्हणाले, बाबूराव भोनकर हे शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि समाजाच्या विकासासाठी समर्पित नेते होते. त्यांनी खरवलीसह तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मुख्य प्रवाहात आणले. सह्याद्री पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून त्यांनी माणगाव तालुक्यात समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. तटकरे पुढे म्हणाले, माझ्या राजकीय आयुष्यात मला त्यांच्यासोबत अनेक प्रसंग अनुभवायला मिळाले. ते केवळ राजकारणी नव्हते, तर एक समंजस सल्लागार आणि संवेदनशील माणूस होते. राजकारणाच्या पलीकडे आमचे कौटुंबिक नाते होते. त्यांनी संवादातून मतभेद मिटवले आणि लोकांना एकत्र आणले. त्यांच्या कार्यामुळे माणगाव तालुक्याच्या विकासाला गती मिळाली.
.....................
माणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान
माणगाव (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पिकावर येणाऱ्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. हातातोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. माणगाव तालुक्यातील लोणेरे, पन्हळघर, निजामपूर, गोरेगाव, कोलाड, हरवंडी, मूर, देवळी, भिंताड, चिंचवळी, अंबर्ले, नागाव उसरघर, नवघर, रेपोली, भांदरे, पन्हळघर बुद्रुक, चाफडी आदी भागात शेतकऱ्यांनी या वर्षी मोठ्या आशेने भात लागवड केली होती. मात्र गेल्या आठवडाभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून पिके कुजली, धान कोसळले, तसेच बुरशी व कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या संपूर्ण हंगामाची वाट लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे असा चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामदास वारिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारकडे तत्काळ मदतीची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी वारिक यांनी केली.
....................
हयात पत्र वेळेत सादर करण्याचे आवाहन
अलिबाग : शासनाच्या ज्या निवृत्ती वेतन धारकांना व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना जिल्हा कोषागाराकडून निवृत्त वेतन प्रदान केले जाते. त्या सर्व निवृत्तवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्त वेतनधारकांनी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांनी केले आहे. निवृत्ती वेतनधारकांचे हयात प्रमाणपत्र विहीत मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील वेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषण पत्रावर स्वत: हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष स्वाक्षरी करावी, अशी घोषणा पत्रे संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहेत. पुनर्नियुक्त, पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतन, निवृत्ती वेतनधारकांकरीता नियमित नमुना, मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने आदी कोषागारा कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्यावर पाठविण्यात आले आहेत. त्यांनी स्वत:चे हयात दाखले स्वाक्षरी सहपूर्ण करून कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच अधिक माहितीकरिता रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

SCROLL FOR NEXT