ठाणेकर शौर्याचे अभूतपूर्व यश
आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत रौप्य; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
ठाणे, ता. २९ (बातमीदार) ः आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणेकर धावपटू शौर्या अंबुरे हिने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत शौर्याने रौप्य पदक पटकावले आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बुधावारी (ता. २९) ठाण्यात शौर्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला असून, विशेष कौतुक केले.
बहरीन येथे १०० मीटर हर्डल्स (अडथळा शर्यत) स्पर्धा नुकतीच पार पडली. शौर्याने या स्पर्धेत १३.७३ सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताला आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आणखी एक मानाचे पदक मिळाले. या यशाबद्दल एकनाथ शिंदे यांनी सांगितले, की शौर्याने दाखवलेले धैर्य, मेहनत आणि क्रीडा कौशल्य हे ठाणे आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशामुळे देशाचे नाव उज्ज्वल झाले आहे. या सोहळ्याला शौर्याचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, वडील पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि आई पोलिस उपायुक्त रुपाली अंबुरे हेही उपस्थित होते.
शौर्याच्या या यशामुळे ठाणे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिची जिद्द, शिस्त आणि कठोर मेहनत ही आजच्या पिढीतील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रातील हा अभिमानास्पद क्षण अनेक तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे.
भारतासाठी सुवर्णपदक मिळवण्याचे लक्ष्य
याप्रसंगी ठाणेकर नागरिकांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव करीत तिचे मनापासून अभिनंदन केले. शौर्या म्हणाली की देशासाठी खेळण्याची आणि पदक जिंकण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं. माझ्या कुटुंबीयांनी आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. पुढेही भारतासाठी सुवर्णपदक मिळवण्याचे माझे लक्ष्य आहे, असे तिने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.