मुंबई

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा

CD

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
कळंबोली पोलिसांकडून सुरक्षा जनजागृती अभियान
पनवेल, ता. २९ (बातमीदार) : सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, यासाठी कळंबोली येथे सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली येथे सोमवारी (ता. २७) दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत सायबर सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कळबोली रोडपाली तलाव परिसरात सायबर जनजागृती स्टॉल उभारण्यात आला. या स्टॉलवर सायबर गुन्ह्यांविषयी जागृती करणारे बॅनर लावण्यात आले. तसेच नागरिकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पत्रके वाटण्यात आली. दरम्यान, रोडपाली तलाव येथे आयोजित छटपूजा कार्यक्रमादरम्यानही सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या जनजागृती उपक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला. रोडपाली तलाव परिसरात छटपूजेसाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होती. सावध राहा, सतर्क राहा, हा संदेश देत सायबर सुरक्षा जनजागृती अभियान यशस्वीपणे पार पडले.
..........
चौकट
अनोळखी व्यक्तीस ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा प्रकार असल्यास घाबरू नका, पोलिस ठाण्याशी संपर्क साधा.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक खात्रीशीर करा. दुप्पट पैसे, सवलती, तत्काळ कर्ज अशा प्रलोभनांना बळी पडू नका, सायबर फसवणुकीस तत्काळ मदत हवी असल्यास १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
............................
कोट
आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. फसवणूक करणारे भामटे विविध नवे मार्ग अवलंबून सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीस आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स किंवा ओटीपी कधीही देऊ नये. तसेच ‘डिजिटल अरेस्ट’, ‘दुप्पट पैसे मिळतील’ किंवा ‘जलद कर्ज मिळेल’ अशा संदेशांना बळी पडू नका. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि सतर्कता हीच खरी शक्ती आहे.
- राजेंद्र कोते, पोलिस निरीक्षक, कळंबोली पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Latest Marathi News Live Update : फलटणमधील डॉक्टर आत्महात्या प्रकरणी संशयित आरोपींना २ दिवसाची पोलिस कोठडी

'बाबा आम्हाला वाचवा' खिडकीतून मुलं ओरडत होती, बाहेरून पालकांचा जीव कासावीस होत होता, पवई स्टुडिओ प्रकरणातील धक्कादायक Video

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Baba Vanga Horoscope Prediction : भयंकर ! पूर्वेत युद्ध ते सोन्याच्या किंमतीत महत्वाचे बदल ; बाबा वेंगाची 2026 साठीचं भाकीत उघड

SCROLL FOR NEXT