मुंबई

रेल्वे स्थानकातील बंद स्वयंचलित जिन्याला भावपूर्ण श्रद्धांजली

CD

बंद स्वयंचलित जिन्याला भावपूर्ण श्रद्धांजली!
बदलापूर, ता. ३१ (बातमीदार) : बदलापूर रेल्वेस्थानकातील गेल्या पंधरवड्यापासून बंद असलेल्या स्वयंचलित जिन्याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीने (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस) आज अनोखे ‘श्रद्धांजली’ आंदोलन केले. बंद असलेल्या एस्केलेटरला पुष्पहार घालून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अर्पण करत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत खासदारांकडून आलेले पत्र स्टेशन मास्तरांकडे सादर करण्यात आले.
बंद असलेला स्वयंचलित जिना तत्काळ सुरू करावा. प्लॅटफॉर्म क्र. २ वरील विकासकामे पूर्ण होताच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संरक्षक जाळ्या त्वरित काढाव्यात. लोकल गाड्यांची संख्या वाढवावी व त्या वेळेवर चालवाव्यात अशा प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर केल्याची माहिती अविनाश देशमुख यांनी दिली. या आंदोलनात अविनाश देशमुख (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट), किशोर पाटील (शिवसेना ठाकरे गट) यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

Raj Thackeray : पुरावा कुठाय विचारता ना? हे घ्या! राज ठाकरेंनी फक्त आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला...

Sky Football Stadium: सौदी अरेबियातील स्काय स्टेडियमचा व्हायरल Video खोटा! समोर आलं वेगळंच सत्य

'साधी माणसं' फेम अभिनेता होणार बाबा; डोहाळे जेवणाला पत्नीसोबत थाटात केली एंट्री, होणाऱ्या आईच्या लूकने वेधलं लक्ष

Latest Marathi News Live Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

SCROLL FOR NEXT