मुंबई

ठाण्यात नव्या कपड्याच्या गठ्ठ्यातून गुटख्याची तस्करी

CD

ठाण्यात कपड्याच्या आड गुटख्याची तस्करी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणे पोलिसांच्या कासारवडवली विभागाने घोडबंदर रोडवरील नागला बंदर येथे पहाटे गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत, नव्या कपड्याच्या गठ्ठ्यांमध्ये लपवून आणलेला ५८ लाख १२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी वसई पूर्व येथील जगराज सिंग जसबीर सिंग खैरा याला शुक्रवारी (ता. ३१) अटक करण्यात आली असून, ठाणे न्यायालयाने त्याला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
घोडबंदर रोडवरील नागला बंदर येथे गुरुवारी (ता. ३०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारासकासारवडवली वाहतूक उपविभागातील पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भालेराव हे गस्तीवर होते. यावेळी केलेल्या तपासणीत वाहनामध्ये संशयास्पद माल निदर्शनास आला. एका वाहनात सुमारे १२० ते १३० कपड्याचे गठ्ठे होते. यातील काही गठ्ठ्यांच्या मागे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी व तंबाखू (गुटखा) लपवण्यात आला होता. पोलिसांनी ५८ लाख १२ हजार रुपयांचा गुटखा, गुटखा लपवण्यासाठी वापरलेले ११ लाख रुपयांचे कपडे आणि ३० लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT