मुंबई

अखेर पाच महिन्यांनंतर पगार!

CD

पालघर, ता. ३ : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या भाषा शिक्षकांना अखेर एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतचे पगार वितरित करण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून हे शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीच्या सुट्टीमुळे शिक्षकांचे पगार रखडले होते; मात्र गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेकडून आठ पंचायत समित्यांना शिक्षकांचे नऊ कोटी ५३ लाखांच्या जवळपासचे पगार वर्ग करण्यात आले आहेत.

पालघर जिल्हा परिषदेत अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेने कंत्राटी, मानधन तत्त्वावर बाराशे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये काही शिक्षकांना १६ हजार रुपये प्रति महिना, तर काही शिक्षकांना २० हजार रुपये पगार ठरवण्यात आले होते. या शिक्षकांना केवळ जूनचा पगार दिला होता, मात्र एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतचे वेतन न आल्याने शिक्षकांची आर्थिक अवस्था वाईट झाली. काही शिक्षकांचे घर या कंत्राटी नोकरीवरच आहे. पाच ते सहा महिने वेतन नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च, शाळांची फी, घर खर्च चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर होता, म्हणून अनेक शिक्षकांनी उसनेवारी करून आतापर्यंत खर्च भागवला होता.

दिवाळीच्या आधी राज्य सरकारने कोषागार कार्यालयाला वेतन जमा केले, मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे वेतन होऊ शकले नाही. गेल्या आठवड्यात कोषागार कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या वेतन विभागाकडे पगार वर्ग केले. तेथून ही रक्कम आठ पंचायत समित्याकडे पाठवले गेले. त्यानंतर शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा करण्यात आली.

कोषागार कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला कंत्राटी शिक्षकांच्या पगाराचे पैसे जमा झाले होते. गेल्या आठवड्यात हे पैसे शिक्षकांना वितरित करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर पाठवण्यात आले आहे. तेथून शिक्षकांना पगार झालेले आहेत.
- सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा परिषद (प्राथमिक)

कंत्राटी शिक्षकांचे पगार (एप्रिल ते सप्टेंबर)
पेसा मानधन शिक्षक ६१८
कंत्राटी शिक्षक ५४८
सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक ३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिलीप सोपलांनी जागवल्या आठवणी! अजितदादांनीच केले मला मंत्री; चेष्टा करणारा मी एकमेव आमदार, एकदा मी झोपेत असताना सकाळी ६ वाजताच दादांचा कॉल आला अन्‌...

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

Chandigarh Schools Bomb Threat: चंदीगडमधील ९ पेक्षा अधिक शाळांना बॉम्ब स्फोटाची धमकी; कॅम्पस तातडीने केले रिकामे

SCROLL FOR NEXT