कल्याण-शहाड उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद
दिवसभर भीषण वाहतूक कोंडीची समस्या
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : कल्याण-नगर महामार्गावरील (एनएच-६३) शहाड रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारपासून बंद करण्यात आल्याने कल्याण आणि उल्हासनगर परिसरात तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
कल्याण-उल्हासनगरसह मुरबाड व अहिल्यानगरकडे जाणारा हा महत्त्वाचा पूल बंद झाल्याने वाहने पर्यायी मार्ग असलेल्या वालधुनी पूल आणि पात्रीपूल उड्डाणपुलाकडे वळवण्यात आली. यामुळे वालधुनी पुलावर सकाळपासूनच वाहनांचा प्रचंड ताण वाढला. साधारणपणे १०-१५ मिनिटांत पार होणारे अंतर पूर्ण करण्यासाठी नागरिकांना एक ते दोन तास लागले. चाकरमानी, शाळकरी मुले आणि सामान्य नागरिकांना यामुळे मोठ्या विलंबाला सामोरे जावे लागले.
वालधुनी, रामबाग, शांतिनगर, सिंडिकेट, शहाड (पूर्व) आणि उल्हासनगरच्या अनेक भागांत वाहतूक कोंडी पसरली. वाहनचालकांच्या अरुंद गल्ल्यांतील शॉर्टकटमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. १९८७ मध्ये बांधलेल्या ५०० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावर प्रथमच पूर्ण रेसर्फेसिंग (डांबरीकरण) केले जात आहे. प्रशासनाने नागरिकांना गर्दीच्या वेळा टाळण्याचे, प्रवासाचे नियोजन करण्याचे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
डीएफसी प्रकल्पासाठी वाहतुकीत बदल
शहाड उड्डाणपुल दुरुस्तीबरोबरच डोंबिवलीतील पलावा परिसराजवळील जुना निळजे फ्लायओव्हर दिल्ली–मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) प्रकल्पासाठी पाडण्यात येणार आहे. यासाठी ७ ते ९ नोव्हेंबर या तीन दिवसांत काम केले जाणार आहे. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक बंद करून त्यांना पर्यायी मार्गांनी वळवण्यात आले आहे. त्याच मार्गावरील इतर दोन उड्डाणपूल छोट्या वाहनांसाठी सुरू राहणार असले, तरी एक उड्डाणपूल बंद होणार असल्याने वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.