मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदत
श्रीवर्धन (बातमीदार) ः राज्यात झालेल्या आकस्मिक अतिवृष्टीमुळे अनेक भागांत ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी, कारागीर आणि ग्रामीण उद्योजकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेने केले आहे. या संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख एक हजार रकमेचा धनादेश उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात मंगळवारी (ता. ४) सुपूर्द करण्यात आला. या वेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, सचिव कुलकर्णी, तसेच पदाधिकारी राजेंद्र वाडेकर, विश्वनाथ लामटे आणि बाळासाहेब निकम उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना गोवर्धन चव्हाण म्हणाले, की राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या सेवेसाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. या नैसर्गिक संकटाच्या काळात त्यांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून ही लहानशी मदत देत आहोत.
................
रोह्यातील विकासकामांचे भूमिपूजन
रोहा (बातमीदार) ः खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक सातमधील प्रितम आयरे, हातकमकर गल्लीपासून अभिजित वारंगे यांच्या निवासस्थानापर्यंत गटार बांधणे, साई मल्हार चौक ते राम निजामकर यांच्या निवासस्थानपर्यंत रस्ता करणे, श्री धावीर प्लाझा आणि श्री धावीर कृपा सोसायटीसमोरील गटार बांधणे, नाना शंकर शेठ रोड ते कलावती मंदिर रस्ता तयार करणे, या विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (ता. ४) स्थानिक ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी नगरसेविका सुजाता चाळके, युवा कार्यकर्ते रवींद्र चाळके, राम निजामकर, रामचंद्र पवार, परेश दामाणी, राजेश देशमुख, मंगेश चाळके, वीरकूट, राजकुमार मोहिते, आनंद गोलिपकर, प्रशांत बांदल, नीलेश शिर्के, हरेश पवार, निलिमा मोहिते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...................
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रबोधिनी संघटनेची मागणी
मुरूड (बातमीदार) ः सलग पावसामुळे मुरूड तालुक्यातील भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात गेली आहे; मात्र शासनाच्या विद्यमान निकषांमुळे प्रत्यक्ष शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे कठीण झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी संघटनेचे मुरूड तालुकाध्यक्ष ॲड. विनायक शेडगे यांनी तहसीलदार आदेश डफळ यांना निवेदन देऊन शासनाने तातडीने निकषांमध्ये बदल करून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना ॲड. शेडगे यांच्यासोबत मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
...................
भाल विठ्ठलवाडीत कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी
पेण (बातमीदार) ः भाल विठ्ठलवाडी येथे कार्तिकी एकादशीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे काकडा आणि सायंकाळी आरती व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी (ता. १) रात्री हभप स्नेहल पित्रे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्यांना तबला साथ जितेंद्र म्हात्रे तर हार्मोनियम साथ समाधान म्हात्रे यांनी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वर दिंडीचे आयोजन झाले. त्यानंतर हरदासी कीर्तन, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री स्नेहल पित्रे यांच्या अंतिम कीर्तनाने कार्यक्रमांची सांगता झाली.
................
मुरूड येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर
मुरूड (बातमीदार) ः मुरूड पद्मदुर्ग लीग, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय व लायन्स क्लब मुरूड-जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स हेल्थ फाउंडेशन यांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. ७) वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, मुरूड येथे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी नेत्रचिकित्सेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच रक्तदान हे श्रेष्ठ दान जाणून रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन लायन्स क्लब मुरूड-जंजिराचे खजिनदार मकरंद कार्णिक यांनी केले आहे.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT