मुंबई

राष्ट्रीय एकता परेडमध्ये महाराष्ट्राचा गौरव

CD

राष्ट्रीय एकता परेडमध्ये महाराष्ट्राचा गौरव
पोलिस अधिकारी सविता गर्जे यांच्या नेतृत्वाखाली दलाचे उत्कृष्ट सादरीकरण
श्रीवर्धन, ता. ५ (बातमीदार) ः भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गांधीनगर (गुजरात) येथे ३१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या भव्य राष्ट्रीय एकता परेडमध्ये महाराष्ट्र पोलिस दलाने राज्याचा मान उंचावला. या परेडमध्ये श्रीवर्धन विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) सविता गर्जे यांनी महाराष्ट्र पथकाचे नेतृत्व करत राज्याचे प्रतिनिधित्व केले.
गांधीनगर येथील या राष्ट्रीय सोहळ्यात सीआयएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी तसेच देशातील दहा राज्यांच्या पोलिस पथकांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्राचे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. १७० एसआरपीएफ अंमलदार आणि ८५ ब्रास बँड सदस्य यांचा समावेश असलेल्या पथकाने अत्यंत शिस्तबद्धतेने आणि अचूक ताळ्यावर परेड सादर केली. या परेडसाठी महाराष्ट्र पथकाने २१ सप्टेंबरपासून गांधीनगर येथील बीएसएफ कॅम्पमध्ये सलग एक महिन्याहून अधिक काळ सराव केला. या काळात सर्व सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून विजयादशमी आणि दिवाळी हे सण देशसेवेच्या भावनेने कॅम्पमध्येच साजरे केले. त्यांच्या या समर्पणाने एकता परेडचा खरा अर्थ उजळून निघाला. एसडीपीओ सविता गर्जे यांच्या कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्र पोलिस पथकाचे सादरीकरण परेडमधील सर्वोत्तम ठरले. त्यांच्या परिश्रम आणि नेतृत्वगुणांचे कौतुक महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी परेडनंतर विशेष अभिनंदन केले. सविता गर्जे यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र पोलिस दलाने राष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद स्थान मिळवले.
.................
परेडसोबतच महाराष्ट्राच्या चित्ररथानेही प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले. आकर्षक सादरीकरणामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वांच्या भुवया उंचावणारा ठरला. या चित्ररथाचे नेतृत्व कोकणातील गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र सिद्धेश विलास जालगावकर यांनी केले. एकता, शिस्त आणि देशभक्तीच्या भावनेने भारलेली ही परेड महाराष्ट्र पोलिसांच्या सामर्थ्याचे आणि संघभावनेचे प्रतीक ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT