मुंबई

मालमत्ताधारकांना शास्ती माफ करावी

CD

वसई, ता. ९ (बातमीदार) ः वसई-विरार शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी थेट सरकारदरबारी गाऱ्हाणे घातले आहे. वसई-विरार महापालिकेतील सर्व मालमत्ताधारकांना शास्ती माफ करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

वसई-विरार महापालिकेत १० लाख मालमत्ताधारक आहेत. यातील ६५ हजारांहून अधिक मालमत्तांना शास्ती आकारण्यात येते. औद्योगिक वसाहतीतील रहिवासी घरांचादेखील समावेश आहे. शास्ती रकमेचे प्रमाण मूळ करांपेक्षा जास्त असल्याने करभरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांमध्ये उदासीनता दिसून येते, त्यामुळे शास्तीसह मूळ कराचाही भरणा करीत नाहीत, असे ठाकूर यांनी सांगितले.

वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्या दृष्टीने विकासात्मक कामे प्रलंबित आहेत. प्राथमिक सुविधा, तसेच विकासाची कामे करण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे ५० कोटींचा निधी महापालिकेला मिळावा, जेणेकरून कामांना गती येईल, अशी मागणी केली आहे. या वेळी माजी महापौर नारायण मानकर, अशोक कुलास, अशोक ग्रोवर, प्रकाश वनमाळी शिष्टमंडळात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT