लग्नाच्या भूलथापातून तरुणीची फसवणूक
खालापूर, ता. ६ (बातमीदार)ः लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणात खालापूर पोलिसांनी अभिजित पाटील (वय ३६, रा. गोरठण, मूळ फलटण, सातारा) येथील तरुणाला अटक केली आहे.
पीडित तरुणीचे दोन वर्षांपासून अभिजितसोबत प्रेमसंबंध होते. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले होते; पण पाच महिन्यांची गरोदर राहिल्याने पीडितेने अभिजितकडे लग्न करण्याची मागणी केली. यावरून तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ४) गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिजितला अटक करण्यात आली आहे.