मुंबई

नवी मुंबईत वाढली डासांची भुणभुण

CD

नवी मुंबईत वाढली डासांची भुणभुण
हिवताप व डेंगीचा धोका; विशेष धूरफवारणी मोहीम सुरू
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) ः नवी मुंबईत सध्या डासांची भुणभुण मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. लांबलेला पाऊस आणि मधूनमधून पडणारे ऊन अशा विचित्र हवामानामुळे डासांच्या प्रचंड पैदाशीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया यांसारख्या रोगांचा धोका वाढला असून महापालिकेकडे तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने विशेष धुरीकरण मोहीम हाती घेतली आहे.
संध्याकाळ होताच डासांचा त्रास अधिक वाढतो. नागरिकांना चावे घेत डास अक्षरशः हैराण करत आहेत. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने साप्ताहिक नियोजनानुसार सकाळ-संध्याकाळ अळीनाशक फवारणी आणि रासायनिक धुरीकरण सुरू केले आहे. विशेषतः खाडीकाठचा आणि दलदलीचा भाग हिवाळ्यात डासांच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरतो. त्यामुळे या काळात नियमित धुरीकरणासोबतच अतिरिक्त सायंकालीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत राबवली जाणार आहे. सकाळच्या वेळी गटारांमध्ये अळीनाशक फवारणी केली जाते, तर सायंकाळी गावठाण, झोपडपट्टी, सोसायट्यांमधील मीटर रूम, जिने इत्यादी ठिकाणी रासायनिक धुरीकरण केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT