शाश्वत शहरासाठी सात कलमी अभियानाची सुरुवात
चर्चासत्राला गृहसंकुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ः आयुक्तांचे आवाहन
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : सध्या निसर्गाचा ढासळलेला समतोल आणि बदललेले ऋतुमान पाहता अनेक नैसर्गिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची हीच ती वेळ असून, पालिकेने ठरविलेल्या सात कलमी मुद्द्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.
शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. कल्याणच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात झाले
ल्या या सत्रामध्ये विविध गृहसंकुलांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, घनश्याम नवांगुळ, उपआयुक्त संजय जाधव, विभागीय संचालक भूषण मानकामे, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करण्यात आले.
गोयल म्हणाले की, या सात मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी गृहसंकुलांनी त्यांच्या स्तरावर छोट्या-छोट्या समित्या गठित केल्या पाहिजेत आणि या समित्यांच्या माध्यमातून इतर रहिवाशांमध्ये याबाबत जागरूकता करून प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे. नागरिकांच्या छोट्या-छोट्या सवयींमुळे शहरात मोठा बदल घडवून आणता येतो. प्रशासन म्हणून आम्ही आमची जबाबदारी ओळखून या सात मुद्द्यांवर गांभिर्याने कार्यवाही सुरू केली असून, गृहसंकुलांनीही आता त्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी उपस्थित नागरिकांना केले.
सात कलमी कार्यक्रम
अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि विद्युत-यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण, सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्षलागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या सात मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सात कलमी कार्यक्रमांवर चांगले काम करणाऱ्या सोसायट्यांना प्रशासनाच्या वतीने मालमत्ता करात सूट देण्यासह इतरही फायदे देण्याचा विचार सुरू असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.