ठाण्यात फुकट प्रवासाला ब्रेक
दहा महिन्यांत २४ हजार विना-तिकीट प्रवाशांवर कारवाई
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : तिकिट नको, असा विचार करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ठाणे स्थानकात चांगलाच धडा मिळाला आहे. या वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत ठाणे स्थानकात विना-तिकिट प्रवास करणाऱ्या तब्बल २४ हजार २०० प्रवाशांना ठाणे रेल्वे प्रशासनाने पकडले आहे. त्यांच्याकडून सुमारे ६० लाखांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
ठाणे स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी काही विनातिकीट वेळ कमी आहे, या सबबींनी सुटण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेल्वे तपासक थेट दंडाची पावती फाडतो. दुसरीकडे, तपासणी निरीक्षकांची संख्याही मोजकी असताना केलेली ही कारवाई म्हणजे रेल्वेची ‘स्मार्ट क्लीयरन्स’ असेच म्हणावे लागणार आहे. प्रत्यक्षात फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या याहून अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहे.
६० लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल
रेल्वे प्रशासनाकडून तिकिट काढा, दंड वाचवा, अशी आवाहने सातत्याने होत असतात. तरीही काही प्रवासी मात्र जोखीम उचलून गाडीत चढताना दिसतात. त्यातील काही पकडले जातात, तर काही सुटतात. विनातिकीट पकडल्यावर साधारणपणे २५० रुपये दंड आकारला जातो. त्यानुसार २०२५ या वर्षातील दहा महिन्यात पकडलेल्या २४ हजार २०० फुटक्या प्रवाशांकडून सुमारे ६० लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
२५० रुपये दंड भरण्यापेक्षा १० ते २० रुपयांची तिकीट काढून प्रवास करावा. आता तिकीट काढण्यासाठी लांबलचक रांगा लावण्याची गरज नाही. विशेषत: तिकीट काढण्यासाठी वेगवेगळे उपक्रम रेल्वेकडून सुरू केले आहेत. शिवाय, मोबाईल फोनवरूनही स्थानकात पोहोचण्यापूर्वी तिकीट काढता येईल, अशी सुविधा उपलब्ध आहे. याचा वापर करावा, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
२०२५ मधील फुकट्या प्रवाशांचा तक्ता
महिना पकडलेले प्रवासी संख्या
जानेवारी २६००
फेब्रुवारी २०००
मार्च २५००
एप्रिल २३००
मे २३००
जून २७००
जुलै ३३००
ऑगस्ट २४००
सप्टेंबर २२००
ऑक्टोबर १९००
एकूण २४,२००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.