मुंबई

‘एचआयव्ही’ ग्रस्त रुग्णाची फरफट!

CD

‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्णाची फरपट!
शताब्दी ते कूपर धावपळ; अखेर ‘नायर’मध्ये उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पालिकेचे कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका ३७ वर्षीय रुग्णाला ३१ ऑक्टोबर रोजी पोटदुखीच्या तक्रारीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांना एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर शताब्दी रुग्णालयात उपचार होणार नसल्याचे सांगत कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथून पुढे नायर रुग्णालयात पाठवून रुग्णावर महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या फरपटीत या रुग्णाला आणि त्याच्या नातेवाइकांना नाहक त्रास सोसावा लागला असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, त्या वेळी शस्त्रक्रिया विभाग निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याने रुग्णाला कूपर रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे कारण शताब्दी रुग्णालयाने दिले आहे.

संंबधित रुग्णाच्या अल्ट्रासाउंड तपासणीत त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांत खडे असल्याचे निदान झाले होते. रुग्णाला आपत्कालीन अ‍ॅपेंडेक्टॉमीसाठी तत्काळ दाखल करण्यात आले, मात्र या तातडीच्या शस्त्रक्रियेपूर्वीच रुग्णाला त्याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबरलाच शस्त्रक्रिया न करता डिस्चार्ज देण्यात आला आणि तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने कूपर रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे, असे पत्रात स्पष्ट लिहिण्यात आले. कूपर रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने रुग्णाला परत शताब्दी रुग्णालयात पाठवले. रुग्ण पुन्हा शताब्दी रुग्णालयात परतला, जिथून त्याला नायर रुग्णालयात रेफर केले. यामध्ये रुग्णाच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह स्वरूपामुळे त्याच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. याबाबत शताब्दी कांदिवली वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांना विचारले असता त्यांनी हे आरोप चुकीचे असून, रुग्णावर महापालिकेच्या नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असल्याचे सांगितले.

रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले की, ‘संबंधित रुग्ण आला तो वार शुक्रवार होता. दुसऱ्याच दिवशी शनिवार असून, तो दिवस शस्त्रक्रिया विभाग निर्जंतुकीकरण करण्याचा होता. तसेच रुग्णाची स्थिती पाहता त्याच्यावर ही शस्त्रक्रिया लगेचच होणे आवश्यक होती. त्यामुळे रुग्णाला लगेच कूपर रुग्णालयाकडे जाण्यास सुचवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT