मुंबई

आमदारांची विरोधकांवर कडाडून टीका!

CD

...हे तर शिंग नसलेले बैल!

भाजपचे शिवसेनेच्या आव्‍हानाला प्रत्युत्तर

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) ः अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असे आव्‍हान देणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) भाजपनेही जाेरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंगावर घेऊ म्हणणारे शिंग नसलेले बैल असल्याची टीका भाजपचे आमदार किसन कथाेरे यांनी केली आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दाेन प्रमुख पक्षांत जुंपल्याचे चित्र दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रचार कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांनी अंगावर आलेल्यांना शिंगावर घेऊ, असे आव्‍हान देत भाजपवर टीका केली हाेती. त्यामुळे कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संघर्ष उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर युती न झाल्यामुळे शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. शनिवारी (ता. ८) भाजप आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात शहरातील विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शिंगावर घेणारे म्हणणारे शिंग नसलेले बैल आहेत. त्यांना आवळून ठेवले तरच बदलापूर शहराची प्रगती होईल, अशी जिव्‍हारी लागणारी टीका कथाेरे यांनी केली.
---
शिवसेनेसाठी महायुतीचे दार खुले!
आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहोत. आम्हाला महायुतीमधील सर्वच घटक पक्षांना सोबत घेऊन चालायचे आहे. त्यामुळे शिवसेनेने युतीसाठी पुढाकार घेतला तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांना महायुतीचे दार अजूनही भाजपने खुले असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी स्पष्‍ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT