मुंबई

गुजरातच्या ट्रक चालकाला ठाण्यात मारहाण करत लुबाडले; आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

CD

गुजरातच्या ट्रकचालकाला ठाण्यात मारहाण करत लुबाडले; आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः गुजरात, राजकोट येथून माल घेऊन ठाण्यात आलेल्या ट्रकचालकाला आठ ते दहा मुलांनी अडवून त्यातील एकाने पाच हजारांची पावती फाडण्यास सांगितले. त्याला नकार दिल्यावर त्या ट्रकचालकाला मारहाण करत लुबाडल्याची घटना वागळे इस्टेट, केणी नगर येथे घडली. याप्रकरणी आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रकचालक नाजीम अली (३५) हे ४ नोव्हेंबर रोजी राजकोट येथून माल घेऊन ठाण्यातील वागळे इस्टेट येथे निघाले होते. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पोहोचल्यावर रस्ता चुकल्याने वागळे इस्टेट केणी नगर येथे तक्रारदारांनी गाडी थांबवली. त्या वेळी तिथे असलेल्या आठ ते दहा अनोळखी जणांपैकी एका इसमाने तो येथील भाई आहे, त्याचे नाव आप्पा चौगुले आहे, असे सांगून गाडी सोडण्यासाठी पाच हजार रुपये प्रवेश पावती फाडावी लागेल, असे सांगितले.
तक्रारदारांनी पैसे नाही, कंपनीकडून पैसे घ्या असे सांगताच त्या मुलांना राग आल्याने त्यातील दोन मुलांनी ट्रकच्या आत येत, चावी काढली. तसेच तक्रारदाराला बाहेर ओढून जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच पँटच्या खिशातील जबरदस्तीने पाकीट एका मुलाने काढून घेतले. दुसऱ्या मुलाने शर्टच्या वरच्या खिशातील मोबाईल काढला. अशाप्रकारे आठ हजार रुपयांची रोकड, मोबाईल असा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT