मुंबई

महिलेला बळजबरीने कामावर नेण्याचा प्रयत्न

CD

महिलेला बळजबरीने कामावर नेण्याचा प्रयत्न
वाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल
वाडा, ता. ९ (बातमीदार) ः कातकरी समाजातील महिलेला बळजबरीने वीटभट्टीवर नेण्याचा प्रयत्न श्रमजीवी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे रोखण्यात आला. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गौरापूर येथील कातकरी समाजातील महिला पती व दोन मुलांसह वीटभट्टीवर काम करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सुदर्शन भोईर (रा. पिंपळास, ता. वाडा) यांच्याकडून वीटभट्टीवरील कामासाठी एकूण २८ हजार रुपये आगाऊ म्हणून घेतले होते; परंतु तेव्हापासून ती कामावर गेली नव्हती. अखेर शनिवारी (ता. ८) सुदर्शन भोईर पत्नी, मुलगा व तक्रारदार महिलेची नणंद गौरापूर येथे आले. आगाऊ पैसे घेतल्याने आता कामावर यावेच लागेल, असे सांगत महिलेला बळजबरीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मुलाची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी कामावर येण्यास नकार दिला. त्यानंतर भोईर यांच्या पत्नीने महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने कामावर नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या वेळी झालेल्या आरडाओरडीमुळे गावातील श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुका सचिव सूरज दळवी, नामदेव पवार यांनी हस्तक्षेप करून महिलेची सुटका केली. त्यानंतर संघटनेच्या पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा पऱ्हाड, सूरज दळवी, बाळू लहांगे, सुजाता पारधी यांच्या मदतीने महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार वाडा पोलिसांनी वीटभट्टी मालक सुदेश भोईर, पत्नी व मुलाविरोधात भारतीय न्याय संहितेसह वेठबिगारपद्धती उच्चाटन अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस उपअधीक्षक समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT