मुंबई

सर्वोदयनगर रस्त्याचे काम विलंबित

CD

सर्वोदयनगर रस्त्याचे काम संथ गतीने
जोगेश्‍वरी, ता. ९ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदयनगर मार्गावरील रस्त्याचे काम पावसाळ्यानंतरही विलंबित असून, सध्या फक्त एका बाजूचे पॅचवर्क सुरू झाले आहे. उर्वरित काम पुढील टप्प्यात होणार आहे, असे रस्ते विभागाने सांगितले आहे. रस्त्यालगतच्या कचराकुंडीतील कचरा अनेक दिवस न उचलल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिकांनी पालिकेवर निष्काळजीचा आरोप केला आहे.
रस्ता खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनीला थेट जोडलेल्या पाच नियमबाह्य घरगुती नळजोडण्या तुटल्या होत्या. संबंधित अभियंता हेमंतकुमार शर्मा यांनी त्या तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा जोडल्या असल्याची माहिती दिली; मात्र मुख्य वाहिनीला थेट जोडणी देणे नियमबाह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे आणि याबाबत जल विभागाला सूचना देणार असल्याचे सांगितले. रस्ते कामातील विलंब, कचरा साफसफाईचा अभाव आणि नियमबाह्य जलजोडण्यांमुळे अस्वच्छता, वाहतुकीची अडचण आणि आरोग्याचा धोका वाढला आहे. पालिकेने तातडीने स्वच्छता, रस्त्याचे काम पूर्ण करणे आणि जलजोडणीची तपासणी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT