मुंबई

अल्पवयीन पीडितेच्या गर्भपातास परवानगी

CD

अल्पवयीन पीडितेच्या
गर्भपातास परवानगी

आराेग्यास धाेका असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : गर्भधारणा सुरू ठेवल्यास आरोग्याला धोका असल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने नुकतीच एका अल्पवयीन पीडितेला वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार (एमटीपी) गर्भपात करण्यास परवानगी दिली.

पीडितेची गर्भधारणा सुरू ठेवल्याने तिच्या मानसिक आरोग्याचा आणि शारीरिक त्रास उद्‌भवण्याचा गंभीर धोका निर्माण होईल, असे तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालाचा हवाला देऊन न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने गर्भपात करण्यास परवानगी देताना स्पष्ट केले.
पीडितेचे वय कमी असल्याने ती भावनिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बाळाची काळजी घेण्यास सक्षम नाही, तसेच गर्भधारणा सुरू ठेवल्याने नैराश्य, चिंताग्रस्त किंवा मानसिक विकारांना सामोरे जावे लागू शकते, असे मानसोपचार विभागाने सादर केलेल्या अहवालातही नमूद केल्याचे न्यायालयाने स्पष्ट करून पीडितेची गर्भधारणा सरकारी जे. जे. रुग्णालयात संपुष्टात आणण्याचे आणि राज्य सरकारला मनोधैर्य योजनेनुसार तत्काळ भरपाई देण्याचे आदेश दिले.

इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असलेल्या पीडितेवर शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. चार महिने मासिक पाळी येत नसल्याने ही घटना उघडकीस आली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती २७ आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर पीडितेने आईला सारी हकीगत सांगितली आणि पवई पोलिस ठाण्यामध्ये शेजाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गर्भपाताच्या मागणीसाठी याचिकादाराच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पीडितेला दहावीचा अभ्यास सुरू ठेवायचा असून, मार्च २०२६ मधील परीक्षेची तयारी करायची आहे. तिचे पालक हे कामगार असून, त्यामुळे मुलीची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Numerology Prediction : 'या' मूलांकाच्या लोकांना होईल धन लाभ; आयुष्यात येतील चढउतार, अंकशास्त्रानुसार तुमचा आठवडा कसा असेल? पाहा

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

SCROLL FOR NEXT