मुंबई

सुभाष पवार भाजपाच्या गोटात!

CD

सुभाष पवार यांचा लवकरच भाजपत प्रवेश
आमदार किसन कथोरे यांची माध्यमांना माहिती
बदलापूर, ता. ९ (बातमीदार) ः शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघातून आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात निवडणूक लढणारे सुभाष गोटीराम पवार, आता भाजपत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा आमदार किसन कथोरे यांनी केली आहे.
बदलापुरातील आमदार कथोरे यांच्या पक्ष कार्यालयात शनिवारी आयोजित कार्यक्रमात शिंदेसेनेचे पदाधिकारी महेश जाधव यांनी भाजपत प्रवेश केला. सुभाष पवारदेखील लवकरच वरिष्ठांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आमदार कथोरे यांनी माध्यमांना दिली. सुभाष पवार हे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र असून, त्यांना स्थानिक पातळीवर मोठा जनाधार आहे. या वेळी पत्रकारांनी कथोरे यांना, सुभाष पवार यांचा पक्षप्रवेश हा महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे का, असा प्रश्न विचारला असता, यावर आमदार कथोरे यांनी हा धक्का महाविकास आघाडीला नव्हे तर २०२४च्या निवडणुकीत, महायुतीत असूनही माझ्याविरोधात काम करणाऱ्या, काही ‘हौसे, गवसे, नवसें’ना धक्का बसणार असल्याचा टोला, त्यांनी शिंदे सेनेच्या नेत्यांना लगावल्याची चर्चा आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT