मुंबई

आर्मी कर्नलच्या घरी झालेल्या घरफोडीप्रकरणी तिघांना अटक

CD

घरफोडीप्रकरणी तिघांना अटक
अंधेरी, ता. १० (बातमीदार) ः आर्मीत कार्यरत असलेल्‍या कर्नलच्या फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. इतर दोघांमध्ये दीपक कृष्णा धवने आणि विनायक गोपीचंद बाविस्कर यांचा समावेश असून, पोलिसांनी चोरीचे एक पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे आणि ४८० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. अटकेनंतर त्यांना दिंडोशी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मालाडच्या आर्मी कॅम्प, सीओडीमध्ये संबंधित कर्नलचा फ्लॅट असून, ते सध्या लडाख येथे नियुक्तीवर आहेत.
१ नोव्हेंबरमध्ये त्यांच्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटमधून एक पिस्तूल, नऊ काडतुसे, तीन लाखांची आणि चांदीचे दागिने चोरी करून पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच आर्मीच्या एका सुभेदाराच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरीन दीपक, विनायक व अन्य एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेले पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, ४८० ग्रॅम चांदीचे दागिने व काही कॅश जप्त केले आहेत. अटकेच्या भीतीने ते गोवा येथे गेले होते. तिथे काही दिवस मौजमजा करून ते मुंबईत आले होते. दीपक आणि विनायक हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ते दोघेही मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT