मुंबई

भाजपची एकहाती सत्ता येताच कल्याण डोंबिवलीसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार - माजी आमदार नरेंद्र पवार

CD

भाजपची एकहाती सत्ता येताच सुसज्ज रुग्णालय उभारणार ः नरेंद्र पवार
संदीप गायकर यांच्या संकल्पनेतून सीसीटीव्ही वितरणाला प्रारंभ
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर सुसज्ज आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्याची ग्वाही भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. स्थायी समितीचे माजी सभापती संदीप गायकर यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक सातमध्ये राबविण्याऱ्या सीसीटीव्ही वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण-डोंबिवलीसाठी एका चांगल्या सरकारी रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. चांगली आरोग्य सुविधा आपल्याकडे उपलब्ध नसल्याने आपल्याकडील गरीब आणि गरजू रुग्णांना ठाणे-मुंबईतील रुग्णालयांमध्ये पाठवावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत मिळाले, तर चांगल्या रुग्णालयाची आम्ही तातडीने उभारणी करू, असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. यापूर्वी पालिकेमध्ये भाजपचे महापौर, उपमहापौर होते, परंतु एकहाती सत्ता नसल्याने आम्हाला मर्यादा होत्या, परंतु आता केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार अत्यंत सक्षमतेने सांभाळत आहेत. असल्याचेही पवार यांनी सांगितले.
या वेळी हेमलता पवार, प्रिया शर्मा,वैशाली पाटील, डॉ. पंकज उपाध्याय, शामल मंगेश गायकर, राजेश ठाणगे, संदीप गडगे, चंदू बिरारी, गणेश हिरे, प्रशांत महाजन, रोहित लांबतुरे, विवेक कुलकर्णी, भारती सातपुते, रोहित कुलकर्णी, दीपक दोरलेकर, समृद्ध ताडमारे, भगवान म्हात्रे, सदा कोकणे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील पहिलाच उपक्रम
नुकत्याच झालेल्या भाऊबीजेनिमित्ताने स्थायी समितीचे माजी सभापती आणि नगरसेवक संदीप गायकर यांनी प्रभागांमध्ये स्वखर्चातून सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारचा उपक्रम कोणीही राबविला नसल्याचे सांगत नरेंद्र पवार यांनी संदीप गायकर यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. प्रभाग क्रमांक ७ मधील साईबाबा नगर, मारुती मंदिर ढगे चाळ, संतोषी माता मंदिर, शिवाजी नगर, शिवाजी मित्र मंडळ, पारिजात चाळ आणि शिवाजी नगर या भागांमध्ये सीसीटीव्हीचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

Delhi Blast : दिल्लीत २९ वर्षांत किती वेळा झाले स्फोट? संपूर्ण माहिती वाचा एका ठिकाणी

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : गृहमंत्री अमित शहा यांनी आयबी प्रमुखांकडून घेतली माहिती

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

SCROLL FOR NEXT