मुंबई

भटक्या पोतराज समाजाचा सावली फाउंडेशनतर्फे सन्मान

CD

भटक्या पोतराज समाजाचा सावली फाउंडेशनतर्फे सन्मान
कल्याण, ता.१० (बातमीदार) : समाज मानवतेचा संदेश देणारा उपक्रम म्हणून सावली फाउंडेशनतर्फे कल्याण पूर्वेत भटक्या जमातीतील पोतराज समाजाचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. श्रध्देचा आणि जगण्याचा संघर्ष एकत्र पेलणाऱ्या या बांधवांना एक दिवसाचा उदरनिर्वाह, कपडे, महिलांसाठी साड्या आणि मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.
पोतराज समाज देवभक्ती आणि उदरनिर्वाह यांचा संगम साधत आपल्या शरीरावर चाबकाचे फटके सहन करून पिढ्यान्‌पिढ्या परंपरा जपत आला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असतानाही त्यांनी श्रद्धा आणि जिद्दीचा दीप जिवंत ठेवला आहे. सावली फाउंडेशनच्या या उपक्रमातून उपेक्षित घटकांपर्यंत मायेची सावली पोहोचवण्याचा प्रयत्न झाला असून, मानवतेचा खरा उत्सव इथे साकार झाला असल्याचे आयोजक म्हणाले.
पोतराज व इतर भटक्या जमातींना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड यांसारखी कागदपत्रे काढून देण्यासाठी राज्यात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष शिबिरे घेऊन ही कागदपत्रे दिली जातात. भटक्या जमातींच्या मुलांसाठी निवासी शाळा, वसतीगृह आणि शिष्यवृत्ती योजना लागू आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक संधी आणि प्रशिक्षणही दिले जाते. योजनांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा भटक्या-विमुक्त जाती विकास महामंडळाशी संपर्क साधावा, असेही माहितीपूर्ण आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT